VIDEO : आजारी असल्याने महिलेने दोन दिवस दिलं नाही जेवण, माकडाने जे केलं पाहून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 14:12 IST2022-04-15T14:10:19+5:302022-04-15T14:12:35+5:30
Viral Video : जेव्हा मनुष्य प्राण्यांवर प्रेम करतात तेव्हा ते त्यांना जाणवतं. त्यामुळेच जेव्हा ती व्यक्ती प्राण्याजवळ जाते तेव्हा प्राणीही आपली काळजी घेणाऱ्यांना चांगलंच ओळखतात.

VIDEO : आजारी असल्याने महिलेने दोन दिवस दिलं नाही जेवण, माकडाने जे केलं पाहून व्हाल अवाक्
Monkey Reached Old Woman Home: मनुष्य आणि प्राण्यांमधील नातं किती सुंदर आहे हे तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या घटनांमधून पाहिलं असेलच. मनुष्यांनी काही प्राण्यांना आपल्या गरजांनुसार आपल्याजवळ ठेवलं तर काही प्राणी असेही आहेत ज्यांना मनुष्यांजवळ राहणं आवडतं. यातील एक प्राणी आहे माकड. मनुष्य आणि माकडांचं नातं इतकं जवळचं आहे की माकडांना मामा म्हणून बोलवलं जातं.
जेव्हा मनुष्य प्राण्यांवर प्रेम करतात तेव्हा ते त्यांना जाणवतं. त्यामुळेच जेव्हा ती व्यक्ती प्राण्याजवळ जाते तेव्हा प्राणीही आपली काळजी घेणाऱ्यांना चांगलंच ओळखतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक प्रेम दाखवणार व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एका वयोवृद्ध आजीचे लाड करताना, तिला मिठी मारताना दिसत आहे.
व्हिडीओत बघू शकता की, एक माकड वयोवृद्ध महिलेच्या घरात घुसतं. ही महिला गेल्या दोन दिवसांपासून आजारी आहे आणि खाटेवरच झोपून आहे. जेव्हा माकड महिलेजवळ पोहोचलं तेव्हा तिच्यावर प्रेम दाखवू लागलं. माकड आज्जीला मिठी मारताना दिसत आहे. ते तिच्या पोटावर जाऊन बसतं. एखाद्या लहान मुलाप्रमाणे ते वागत आहे.
रोज सुबह एक वृद्घा बंदरों को रोटी देती थी. बीमार होने की वजह से दो दिन रोटी नहीं दे पाई तो बंदर उनका हाल जानने के लिए उसके पास आए.
— Awanish Sharan (@AwanishSharan) April 2, 2022
दिल को छूने वाले क्षण.❤️ pic.twitter.com/K4TdCSKL3w
ही महिला रोज माकडांना जेवण देते. पण काही दिवसांपासून ती आजारी असल्याने ती माकडांना जेवण देऊ शकली नाही. त्यानंतर एक माकड महिलेजवळ आलं आणि त्याने अशाप्रकारे आज्जीवर प्रेम लुटवलं. आज्जी आणि माकडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ IAS अधिकारी अविनाश सरन यांनी ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'रोज सकाळी एक वृद्ध महला माकडांना जेवण देते. आजारी असल्याने दोन दिवसांपासून ती त्यांना जेवण देऊ शकली नाही. तिची तब्येत जाणून घेण्यासाठी माकड तिच्याजवळ आलं. मनाला स्पर्श करणारा क्षण.