Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 14:43 IST2025-09-15T14:41:31+5:302025-09-15T14:43:05+5:30

प्लॅटफॉर्मवर उभे असलेले तरुण लोकोपायलटला ट्रेनच्या अ‍ॅवरेजबद्दल प्रश्न विचारतात. यावर लोकोपायलट देखील त्यांना भन्नाट उत्तर देताना दिसतो. 

Viral Video: 'Oh uncle, how much does this train cost?'; Locopilot gave a bizarre answer to a young man's question! He said... | Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

सोशल मीडियावर नेहमीच गमंतीशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात आगीसारखे व्हायरल होत असतात. आता एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण प्लॅटफॉर्मवर उभे राहून ट्रेनच्या लोकोपायलटशी बोलताना दिसत आहेत. हे तरुण लोकोपायलटला ट्रेनच्या अ‍ॅवरेजबद्दल प्रश्न विचारतात. यावर लोकोपायलट देखील त्यांना भन्नाट उत्तर देताना दिसतो. 

'pohtatoxchipz' नावाच्या अकाउंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये काही मुले रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभी असल्याचे दिसून येते. त्यानंतर एक मुलगा इंजिनमध्ये बसलेल्या लोको पायलटला ओरडून विचारतो की, 'भैया ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते? ड्रायव्हरला पहिल्यांदा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नाही, म्हणून तो मुलगा पुन्हा तोच प्रश्न विचारतो. यावेळी ट्रेन ड्रायव्हर हसत उत्तर देतो की, '१ किलोमीटर चालण्यासाठी ७-८ लिटर डिझेल लागते.'


लोकोपायलटचे हे उत्तर ऐकून, मुले आश्चर्यचकित होतात आणि मोठ्याने हसायला लागतात. त्यापैकी एक गंमतीने म्हणतो की, 'म्हणजे ही ट्रेन सरासरी -८ अ‍ॅवरेज देते.' त्यांचे हावभाव पाहून हे स्पष्ट होते की, यावेळी लोको पायलटने त्यांची खिल्ली उडवली. २७ ऑगस्ट रोजी पोस्ट केलेल्या या रीलला ३२ मिलियन व्ह्यूज आणि १५ लाख लाईक्स मिळाले आहेत.

हा मजेशीर व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे आणि नेटकरी त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, 'भाऊ, हा अ‍ॅवरेज ०.१२५ किमी आहे.' दुसऱ्याने कमेंट केली की, 'लोको पायलटने -८ अॅवरेज बोलून माझे संपूर्ण गणित बिघडवले.' त्याच वेळी, एकाने लिहिले की, 'हे इलेक्ट्रिक इंजिन आहे. हे चालले होते लोकोपायलटची खिल्ली उडवायला, आणि त्यानेच यांना मुर्खात काढलं.'

Web Title: Viral Video: 'Oh uncle, how much does this train cost?'; Locopilot gave a bizarre answer to a young man's question! He said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.