आजारी पत्नीला हाताने घास भरवला; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल, एकदा पाहाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 13:22 IST2023-04-20T13:21:58+5:302023-04-20T13:22:31+5:30
हा व्हिडिओ इंडियन आयडल 5 चा रनरअप राकेश मैनी याने शेअर केला आहे.

आजारी पत्नीला हाताने घास भरवला; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल, एकदा पाहाच...
Viral Video Of Elderly Couple : सोशल मीडियावर दररोज अनेक मनात घर करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध दाम्पत्य ट्रेनमधून प्रवास करताना दिसत आहे. यावेळी आपल्या आजारी पत्नीला तिचा पती हाताने जेवण भरवतो. समोर बसलेल्या एक प्रवाशाने त्यांचा व्हिडिओ काढून शेअर केला.
नेटकऱ्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला असून, अनेकांनी यावर विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 12 एप्रिल रोजी गायक आणि इंडियन आयडल 5 रनरअप राकेश मैनी याने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. रेल्वेत वृद्ध जोडप्याला अनेकांचे डोळे भरुन आले आहेत.
पाहा व्हिडिओ:-
यावेळी ते जोडपे एकमेकांशी गप्पाही मारताना दिसत आहेत. या व्हिडिओबाबत राकेशने लिहिले की, काल रात्री मी या वृद्धाला आपल्या आजारी पत्नीचा हात धरून ट्रेनमध्ये चढताना, तिला खाऊ घालताना पाहिले. रात्री त्याने पत्नीसाठी ट्रेनच्या बर्थवर अंथरुणदेखील टाकले. तिला काही त्रास होऊ नये, यासाठी त्याने हे सर्व काही केले.