'आला अंगावर अन् घेतला शिंगावर'... बैलाशी पंगा घेणाऱ्या तरूणाच्या आले अंगाशी; Video पाहून नेटकरी हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 17:29 IST2023-12-08T17:26:52+5:302023-12-08T17:29:29+5:30
पिसाळलेल्या बैलाला डिवचणे तरूणाला महागात पडले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

'आला अंगावर अन् घेतला शिंगावर'... बैलाशी पंगा घेणाऱ्या तरूणाच्या आले अंगाशी; Video पाहून नेटकरी हैराण
Viral video: चवताळलेल्या प्राण्यांपासून दोन हात लांब राहणं हे नेहमी फायद्याचे ठरते. पण काही महाशय असेही असतात ज्यांना अशा परिस्थितीतही प्राण्यांना डिवचल्यावर आनंद मिळतो. मग बऱ्याचदा अशा महारथींना आपल्या आगाऊपणाची मोठी किंमतही मोजावी लागते.
पाळलेल्या प्राण्यांचा स्वभाव हा मुळात शांतच असतो. म्हणून त्यांना पाळले जाते. पण जर या प्राण्यांना कधी राग अनावर झाला तर त्यांना सांभाळणे अवघड होऊन बसते. असाच एक डोळ्याची झोप उडवणारा चित्तथरारक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडीओमध्ये एका पिसाळलेल्या बैलासोबत पंगा घेणे या तरूणाच्या चांगलेच अंगाशी आले आहे. मुद्दाम कोणत्याही कारणाशिवाय या बैलाची हा तरूण छेड काढताना दिसतोय. त्याचा परिणाम असा की राग अनावर झालेला बैल या तरूणाच्या अंगावर धावून जातो. बैलाने दिलेल्या एका धडकेत हा तरूण जमिनीवर धारातीर्थ कोसळला. हा संपूर्ण व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे.
एका एक्स यूजरने हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केलाय. व्हिडिओला आतापर्यंत ६.१ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित धक्का बसला आहे. शिवाय नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
येथे पाहा व्हिडीओ:
Man provokes a bull and quickly finds out pic.twitter.com/tuSjDqEDNb
— Crazy Clips (@crazyclipsonly) December 5, 2023