Video : अचानक महिलेच्या अंगावर उडी घेत सलूनमध्ये घुसलं हरीण अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 15:35 IST2019-10-10T15:29:46+5:302019-10-10T15:35:27+5:30
केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेलेल्या महिलेच्या अंगावर अचानक हरणाने घेतली उडी अन् पुढे जे झालं ते फारच धक्कादायक होतं.

Video : अचानक महिलेच्या अंगावर उडी घेत सलूनमध्ये घुसलं हरीण अन्...
न्यूयॉर्कमध्ये शनिवारी एक विचित्र घटना घडली. ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. एका हेअर सलूनमध्ये हरीण काच फोडून आतमध्ये आलं आणि आतमध्ये बसलेल्या एक महिलेच्या डोक्यावरून गेलं. एवढचं नाहीतर त्याने दुकानामध्ये प्रचंड तोडफोड केली. सीबीएस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, हरणाने ज्या महिलेच्या डोक्यावरून उडी मारली ती त्या दुकानात हेअर कटसाठी आली होती. या प्रकरणात महिला जखमी झाली आहे.
फेसबुकवर लॉन्ग आयलणन्ड सलूनने सीसीटीव्ही फोटेज शेअर केलं आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, हरीण सर्वात आधी खिडकी तोडून सलूनमध्ये येतं. त्यानंतर तोड फोड करतं. हरीण आल्यामुळे सलूनमधील लोक घाबरून जातात. तिथून बाहेर पडण्यासाठी हरीण दरवाजा तोडतं आणि निघून जातं.
सदर घटनेचा व्हिडीओ शनिवारी शेअर करण्यात आला आहे. तेव्हापासून त्याला जवळपास 50 हजार व्ह्यू आले आहेत. तसेच एक हजारपेक्षा जास्त लोक कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, हरणाने केलेल्या हल्यात सर्व लोक ठिक आहेत.
दरम्यान, सलूनची मालकिन जेनिसे हेरेदिया असून तिने एनबीसी न्यूजशी बोलताना सांगितले की, 'त्यावेळी माझ्या डोक्यात फार विचार येत होते. आधी मला वाटली की एखादी भरधाव वेगाने येणारी गाडीच दुकानात आली आहे. पण हरीण पाहिल्यानंतर मी ओरडू लागले. मलाकळतच नव्हतं की, त्यावेळी मी नक्की काय करायला पाहिजे होतं.'