Viral Video : मुंबई पोलीस काँस्टेबलनं रस्त्यावर बसून वाजवली बासरी, खुश होऊन तुम्हीही डोलायला लागाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 12:34 PM2022-05-11T12:34:40+5:302022-05-11T13:06:28+5:30

हा कॉन्स्टेबल रस्त्याच्या अगदी मधोमध बसून बासरी वाजवत आहे....

Viral Video Mumbai Police Constable plays flute while sitting on the road, you too will start waving | Viral Video : मुंबई पोलीस काँस्टेबलनं रस्त्यावर बसून वाजवली बासरी, खुश होऊन तुम्हीही डोलायला लागाल

Viral Video : मुंबई पोलीस काँस्टेबलनं रस्त्यावर बसून वाजवली बासरी, खुश होऊन तुम्हीही डोलायला लागाल

Next

सोशल मिडियावर रोजच्या रोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुंबई पोलीस कॉन्स्टेबल 1997 च्या बॉर्डर चित्रपटातील 'संदेसे आते है' (Sandese Aate Hai) हे गाणे बासरीवर वाजवताना दिसत आहे. हा कॉन्स्टेबल रस्त्याच्या अगदी मधोमध बसून बासरी वाजवत आहे. रस्त्यावर शूट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये, एक ट्रॅफिक पोलीसही त्याच्या शेजारी उभा असलेला दिसत आहे. याशिवाय, फोन आणि ब्लूटूथ स्पीकरही रस्त्यावर दिसत आहे.

मुंबई पोलिसाने रस्त्यावर वाजवली धून -
हा व्हिडिओ वडाळा माटुंगा सायन फोरमने (Wadala Matunga Sion Forum) ट्विटरवर अपलोड केला आहे. एवढेच नाही, तर या व्हिडिओला 'रॅक मार्ग वडाळा वेस्टमध्ये रविवारी रस्त्यावर काहीसे असे दृष्य बघायला मिळाले,' असे कॅप्शनही देण्यात आले आहे. हा व्हिडिओ मुंबईच्या वडाळा येथील रफी अहमद किदवई मार्गावर रेकॉर्ड करण्यात आला असून इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर, या व्हिडिओला लोकांचीही पसंती मिळत आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच, अशी होती लोकांची रिअॅक्शन -
एका युजरने सोशल मिडियावर लिहिले, 'हे पाहून फारच छान वाटले, ते सर्व जण, केवळ आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी, एवढे तणावाचे जीवन जगत आहेत. खरे तर त्यांनाही एका विशिष्ट वेळेनंतर ब्रेकची आवश्यकता असते.' आणखी एकाने लिहिले आहे, 'जबरदस्त... वर्दीतील या कठोर आणि मेहनती लोकांना ऐसे करताना पाहून आनंद वाटला.' आणखी एकाने लिहिले, 'वर्दीतील पुरुषांनाही मन आणि भावना असतात.

Read in English

Web Title: Viral Video Mumbai Police Constable plays flute while sitting on the road, you too will start waving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.