Video: कपड्याच्या दुकानात अचानक शिरली भरधाव बाईक, नंतर जे झालं ते पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 13:15 IST2021-11-11T13:14:55+5:302021-11-11T13:15:36+5:30

Social Viral : हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही चक्रावून जाल. कारण ज्याप्रकारे  एक बाइक दुकानात शिरली आणि त्यानंतर जे झालं ते हैराण करणारं आहे.

Viral video : Motorcycle crashes into clothing store in Telangana | Video: कपड्याच्या दुकानात अचानक शिरली भरधाव बाईक, नंतर जे झालं ते पाहून व्हाल अवाक्

Video: कपड्याच्या दुकानात अचानक शिरली भरधाव बाईक, नंतर जे झालं ते पाहून व्हाल अवाक्

Social Viral : सोशल मीडियावर एकापेक्षा एक  मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हैराण करणारे तर काही व्हिडीओ पोट धरून हसायला लावणारे असतात. तर काही व्हिडीओंवर विश्वास ठेवणं कठीण असतं. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही चक्रावून जाल. कारण ज्याप्रकारे  एक बाइक दुकानात शिरली आणि त्यानंतर जे झालं ते हैराण करणारं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हायरल व्हिडीओ तेलंगानातील आहे. खम्मम जिल्ह्याच्या रावीचेट्टू बाजारात एका दुकानाच्या आत अचानक एक वेगाने येणारी बाईक शिरली. इतकंच काय तर बाईकस्वार गाडीहून खाली  पडतो. त्यावेळी दुकानात खरेदी करत असलेल्या लोकांना हा सगळा प्रकार बघून धक्का बसतो. काही क्षणांसाठी त्यांचा श्वासही रोखला गेला असेल. 

सुदैवाने या अपघातात कुणाला काही इजा झाली नाही. पण व्हिडीओ आणि अपघाताने लोकांना हैराण केलं आहे. सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. इतकंच नाही तर लोक या व्हिडीओवर मजेदार कमेंट्सही करत आहेत.
 

Web Title: Viral video : Motorcycle crashes into clothing store in Telangana