Viral Video In Marathi : Shocking video of 5 year old girl playing drums | लय भारी! या चिमुरडीची बॅण्ड वाजवण्याची स्टाईल पाहून भल्याभल्यांना फूटला घाम, पाहा व्हिडीओ

लय भारी! या चिमुरडीची बॅण्ड वाजवण्याची स्टाईल पाहून भल्याभल्यांना फूटला घाम, पाहा व्हिडीओ

सध्याची लहान मुलं ही बरीच एडवासं असतात, असं अनेकदा तुम्हाला  जाणवलं असेल.  कला, संगीत, वादन, डान्स या सगळ्या क्षेत्रात चिमुरड्यांचा एक वेगळा चाहतावर्ग असतो. सोशल मीडियावर असाच एक चिमुरडीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. एक पाच वर्षांची चिमुरडी भन्नाट  ड्रम वादन करत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून नेटिझन्सनी या व्हिडीओला पसंती दिली आहे. ही चिमुरडी या व्हिडीओत ड्रम वाजवत आहे. 

या एका ड्रम वाजवण्याच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. @Rex Chapman या युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या चिमुकल्या बोटांनी ड्रमस्टीक फिरवत ही चिमुरडी बॅण्ड वाजवत आहे. ही सर्वसाधारण मुलगी नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे. नेटिझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.  मोठ्यांनाही जमणार नाही  इतकं सुंदर वादन या चिमुरडीने केलं आहे. Video : वाह, लय भारी! आजीला खुर्चीत बसवून हा पठ्ठ्या खेळतोय गरबा; पाहा व्हिडीओ

८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. २२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे तर ४ हजारापेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. हा व्हिडीओत इतका सुंदर ड्रम या चिमुरडीने वाजवला आहे. यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. हा व्हिडीओ कुठला आहे. याबाबत माहिती मिळाली नाही. याआधीही सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक चिमुरडी क्रिकेटचा सराव करत होती. या व्हिडीओला सोशल मीडिया युजर्सनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला होता. बोंबला! आपल्या प्रियकराला मॉलमध्ये कुत्र्यासारखं फिरवताना दिसली महिला, व्हायरल झाले फोटो....

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Viral Video In Marathi : Shocking video of 5 year old girl playing drums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.