Viral Video: Man Using Fire extinguisher As Hand Sanitizer in Pakistan api | Viral Video : सॅनिटायजर समजून Fire Extinguisher ला त्याने लावला हात अन्.....

Viral Video : सॅनिटायजर समजून Fire Extinguisher ला त्याने लावला हात अन्.....

कोरोना व्हायरसचा फटका पाकिस्तानातही बसला आहे. ३३ पेक्षा जास्त केसेस तिथे आढळून आल्या आहेत. अशात लोक काळजी म्हणून सॅनिटायजरचा वापर करत आहेत. दरम्यान एक मजेदार व्हिडीओ समोर आला आहे. एक व्यक्ती सुपरमार्केटमध्ये फिरत होती. तो फोनवर बोलत होता. बाजूला Fire Extinguisher लावलेलं होतं. त्याने ते दाबलं आणि त्यातून धूर निघू लागला.

हा व्हिडीओ आता यूट्यूब आणि रेडीटवर शेअर करण्यात आलाय. व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ गुजरांवाला येथील असल्याचं बोललं जात आहे. कदाचित या व्यक्तीला वाटलं असेल की, ते सॅनिटायजर आहे. पण ते आग विझवणारं Fire Extinguisher होतं. ते दाबल्यावर त्यातून धूर निघू लागला. 

कोरोनाच्या भीतीमुळे लोक सॅनिटायजरचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. पण बाजारात सॅनिटायजरचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी सॅनिटायजरच्या शोधात फिरत आहेत. 


Web Title: Viral Video: Man Using Fire extinguisher As Hand Sanitizer in Pakistan api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.