अरे देवा! छोट्या भावाला शिकवत होता ड्रायव्हिंग, पुढे जे घडलं त्याचा व्हिडीओ झाला व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 15:04 IST2020-08-18T14:59:54+5:302020-08-18T15:04:07+5:30

एक तरूण त्याच्या लहान भावाला कार ड्रायव्हिंग शिकवत आहे. पण लहान भावाने थोडा असा काही टर्न घेतला की, त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Viral Video : Man took his little brother to teach driving, watch what happen after that | अरे देवा! छोट्या भावाला शिकवत होता ड्रायव्हिंग, पुढे जे घडलं त्याचा व्हिडीओ झाला व्हायरल...

अरे देवा! छोट्या भावाला शिकवत होता ड्रायव्हिंग, पुढे जे घडलं त्याचा व्हिडीओ झाला व्हायरल...

ड्रायव्हिंग शिकणं आणि शिकवणं या दोन्ही कामात संयम फार जास्त लागतो. तसं लहान भावाला किंवा बहिणीला ड्रायव्हिंग शिकवणं वेगळ्या लेव्हलचं काम आहे. हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. हेच दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यात एक तरूण त्याच्या लहान भावाला कार ड्रायव्हिंग शिकवत आहे. पण लहान भावाने थोडा असा काही टर्न घेतला की, त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

@ty_lew2 नावाच्या एका ट्विटर यूजरने हा व्हिडीओ १७ ऑगस्टला शेअर केला होता. त्याने याच्या कॅप्शनला लिहिले की, 'मी माझ्या छोट्या भावाला ड्रायव्हिंगसाठी घेऊन गेलो होतो. जरा बघा तर'. या व्हिडीओला आतापर्यंत २५ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज, ४२ हजारांपेक्षा जास्त रिट्विट आणि १ लाख ६० हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की,  यात लहान मुलगा फारच सीरीअस होऊन कार चालवत आहे. त्याला त्याचा मोठा भाऊ गाइड करतोय. त्याच्याकडे बघूनच लक्षात येतं की, त्याला ड्रायव्हिंग येत नाही. व्हिडीओत सुरूवातीला सगळं काही नॉर्मल दिसतं. पण लहान मुलगा जेव्हा टर्न घेतो तेव्हा सगळा गोंधळ होतो. 

हे पण बघा :

Viral Video : देसी जुगाड करून पाण्यात पळवल्या बाइक, व्हिडीओ पाहून अवाक् झाले लोक...

खतरनाक लँडींग! Video पाहिल्यावर नुसता घामच नाही तर धडकी भरेल

Web Title: Viral Video : Man took his little brother to teach driving, watch what happen after that