आज कुछ तुफानी करते है..; विजेच्या तारांवर तरुणाचे पुशअप, व्हिडिओ एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 19:19 IST2025-03-02T19:19:00+5:302025-03-02T19:19:23+5:30

Viral Video: हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

Viral Video: man started doing pushups on electric wires | आज कुछ तुफानी करते है..; विजेच्या तारांवर तरुणाचे पुशअप, व्हिडिओ एकदा पाहाच

आज कुछ तुफानी करते है..; विजेच्या तारांवर तरुणाचे पुशअप, व्हिडिओ एकदा पाहाच

Trending Video:सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होतात. काही काही व्हिडिओ मजेशीर असतात, तर काही व्हिडिओ अंगावर काटा आणणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही चक्रावून जाल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती असे काम करताना दिसत आहे, जे पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

विजेच्या तारांवर पुश अप...
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हाय व्होल्टेज लाइटच्या खांबावर चढून विजेच्या तारांवर पुश अप करताना दिसतोय. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी चक्रावून गेले आहेत. एखादी व्यक्ती असे कसे करू शकते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे समजू शकले नाही. मात्र, ही व्यक्ती दारूच्या नशेत हे कृत्य करत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.


यापूर्वीही असा व्हिडिओ व्हायरल झाला होता
व्हिडिओमध्ये ती व्यक्ती जे काही करत आहे, तो फक्त वेडेपणा आहे. विजेच्या तारांवर अशाप्रकारे कृत्य करणे म्हणजे जीवाशी खेळ करणे होय. याआधीही सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दारूच्या नशेत एक व्यक्ती विजेच्या तारांवर झोपलेला दिसत होता. 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 
फिटनेसहेवन नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून, अनेकांनी लाईकही केले आहे. सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले...भाऊ, तो यमराजाचा नातेवाईक आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले...देशी प्यायल्यानंतर असेच होते. 

Web Title: Viral Video: man started doing pushups on electric wires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.