बाप रे बाप! केवढा मोठा साप, तरूणाचा सापासोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 12:22 IST2021-10-11T12:19:51+5:302021-10-11T12:22:53+5:30

Snake Viral Video : या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना मजा आली तर काही लोक हैराण झाले. 

Viral video : Man play with giant snake viral video | बाप रे बाप! केवढा मोठा साप, तरूणाचा सापासोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल

बाप रे बाप! केवढा मोठा साप, तरूणाचा सापासोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल

Snake Viral Video : आजकाल लोक काहीतरी वेगळं आणि तूफानी करण्याची फारच इच्छा असते. यासाठी तर ते अनेकदा त्यांचा जीवही धोक्यात घालतात. काही लोकांना यात यश मिळतं तर काही लोक गंमत ठरतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Viral Video) झाला असून त्यात एक तरूण कोब्रा सापासोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना मजा आली तर काही लोक हैराण झाले. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे एक तरूण खतरनाक सापासोबत मस्ती करत आहे. या तरूणाला बघून असं वाटत आहे की, जणू तो एखाद्या खेळण्यासोबत खेळत आहे. तुम्ही बघू शकता की, एक मोठा साप इकडे-तिकडे सरपटत आहे. त्याच्या समोर एक तरूण आहे. तरूण सापाला खेचून आपल्याकडे घेतो आणि त्याच्यासोबत डान्स करू लागतो. सुदैवाने साप त्याला  काही नुकसान पोहोचवत नाही.

तरूण ज्याप्रमाणे सापासोबत खेळत आहे ते पाहून लोक हैराण झाले आहेत. होऊ शकतं की, व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ 'sagar_valva143' नावाच्या अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला. तर १७ लाखांपेक्षा जास्त याला व्ह्यूज मिळाले आहेत. इतकंच नाही तर लोक या व्हिडीओखाली भरभरून कमेंट्सही करत आहेत. 
 

Web Title: Viral video : Man play with giant snake viral video