एका सेकंदात होत्याचं नव्हतं झालं; चौघांवर आकाशातून संकट कोसळलं, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 16:44 IST2022-08-12T16:42:58+5:302022-08-12T16:44:13+5:30
Viral Video: एका सेकंदात चौघांचा मृत्यू, तुमच्याही अंगावर शहारे येतील.

एका सेकंदात होत्याचं नव्हतं झालं; चौघांवर आकाशातून संकट कोसळलं, पाहा Video
Viral Video: पावसाळ्यात झाडाखाली उभं राहू नये, असे म्हटले जाते. याचे कारण म्हणजे, पावसाळ्यात झाडांवर वीज पडण्याची दाट शक्यता असते. पण अनेकदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि भर पावसात झाडाखाली आश्रय घेतात. पण, हे कधी-कधी अतिशय धोकादयक ठरू शकते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात झाडाखाली थांबलेल्या चौघांवर वीज पडल्याचे दिसत आहे.
Don't stand under a tree when it rains☹️
— Tansu YEĞEN (@TansuYegen) August 10, 2022
pic.twitter.com/1jRKEf5Uv6
काही सेकंदांचा हा व्हिडिओ अतिशय भीतीदायक आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, चार जण पावसात एका बागेतील झाडाखाली थांबले आहेत. यावेळी अचानक त्यांच्यावर वीज कोसळते. एका सेकंदातच त्या चौघांचा जागीच मृत्यू होतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही पावसात झाडाखाली थांबण्यापूर्वी शंभर वेळा विचार कराल.
अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ @TansuYegen नावाच्या ट्विटर युजरने शेअर केला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'पावसात झाडाखाली उभे राहू नका.' या व्हिडिओला 1.5 कोटींहून अधिक व्हू मिळाले असून, 2 लाख 34 हजारांहून अधिक लाईक मिळाले आहेत. तुम्हीदेखील पावसात झाडाखाली थांभण्याचा विचार करू नका.