बाप रे बाप! बिबट्यानं केलं असं काही डेरिंग, थेट मगरीच्या तोंडातून हिसकावला तिचा घास आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 11:05 AM2020-07-28T11:05:08+5:302020-07-28T11:22:49+5:30

एका बिबट्याने कल्पनेपलिकडजी हिंमत दाखवली आणि हे करून दाखवलं. म्हणजे त्याने मगरीच्या तोंडातून तिची शिकार हिसकावून आणली.

Viral Video : Leopard steals food straight from a crocodiles mouth watch | बाप रे बाप! बिबट्यानं केलं असं काही डेरिंग, थेट मगरीच्या तोंडातून हिसकावला तिचा घास आणि...

बाप रे बाप! बिबट्यानं केलं असं काही डेरिंग, थेट मगरीच्या तोंडातून हिसकावला तिचा घास आणि...

Next

आता हे सर्वांनाच समजू शकतं की, मगरीच्या तोंडातून तिचा घास हिसकावून आणणे ही काही साधी गोष्ट नाही. कारण मगरीच्या ताकदीची कल्पना सगळ्यांनाच असते. पण एका बिबट्याने कल्पनेपलिकडजी हिंमत दाखवली आणि हे करून दाखवलं. म्हणजे त्याने मगरीच्या तोंडातून तिची शिकार हिसकावून आणली. बिबट्याचं डेरींग दाखवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

@NaveedIRS नावाच्या ट्विटर यूजरने हा व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल की, सापाच्या बिळात हात टाकणं काय असतं. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक पुन्हा पुन्हा बघत आहेत.

व्हिडीओ शेअर करताना यूजरने लिहिले की, 'संधी एकदाच मिळते आणि त्यासाठी जर तुम्ही तयार राहिले नाही तर दुसरा कुणीही त्याचा फायदा घेऊ शकतो. एक बिबट्या चक्क मगरीच्या तोंडातून जेवण चोरत आहे'.

यात तुम्ही बघू शकता की, रात्रीच्या अंधारात एक बिबट्या डेरिंग करत मगरीच्या तोंडातून तिचं जेवण चोरी  करत आहे. पण हे काम करत असताना बिबट्या कशाप्रकारे सतर्क राहतो हेही बघायला मिळतं. कारण त्याला मगरीच्या जबड्याची ताकद माहीत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक चांगलेच हैराण झालेत कारण अशी हिंमत करताना त्यांनी कुणाला पाहिलं नाही.

हे पण वाचा :

अरे वाह रे वाह! लोकांपासून 'इतकी' दूर जाऊन बसली ही व्यक्ती, व्हिडीओ झाला व्हायरल....

अरे व्वा! लॉकडाऊनमध्ये मासेमाराला सापडला तब्बल ८०० किलोंचा मासा; अन् 'एवढ्या' लाखांना झाली विक्री

Web Title: Viral Video : Leopard steals food straight from a crocodiles mouth watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.