अरे वाह रे वाह! लोकांपासून 'इतकी' दूर जाऊन बसली ही व्यक्ती, व्हिडीओ झाला व्हायरल....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 01:32 PM2020-07-27T13:32:42+5:302020-07-27T16:14:28+5:30

रिपोर्टनुसार, काही मित्र दुपारी जवळच्या एका पार्कमध्ये फिरायला गेले होते. त्यांना तिथेत हा अनोखा नजारा दिसला. त्यांनी लगेच याचं रेकॉर्डिंग केलं.

Man enjoys picnic at top of 60ft tree video goes viral | अरे वाह रे वाह! लोकांपासून 'इतकी' दूर जाऊन बसली ही व्यक्ती, व्हिडीओ झाला व्हायरल....

अरे वाह रे वाह! लोकांपासून 'इतकी' दूर जाऊन बसली ही व्यक्ती, व्हिडीओ झाला व्हायरल....

googlenewsNext

कोरोना काळात सोशल डिस्टंसिंगने तुम्ही कोविड १९ पासून स्वत:चा बचाव करू शकता. अशात एका व्यक्तीने ही सोशल डिस्टंसिंगची कॉन्सेप्ट एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे. इतकी की त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रिपोर्टनुसार, काही मित्र दुपारी जवळच्या एका पार्कमध्ये फिरायला गेले होते. त्यांना तिथेत हा अनोखा नजारा दिसला. त्यांनी लगेच याचं रेकॉर्डिंग केलं. त्यांनी कॅमेराने झूम करून पाहिलं तर एक व्यक्ती झाडाच्या टोकावर सॅंडविचचा आनंद घेताना दिसला.

ही घटना आहे  इंग्लंडच्या Bath मधील. हा  व्हिडीओ ३३ वर्षीय Dai Barrow ने २३ जुलैला फेसबुकवर शेअर केला होता. Dai हा एक कस्टमर स्पोर्ट मॅनेजर आहे. त्याने लिहिले की, हे अनोखं दृश्य बुधवारी सायंकाळी Bath मधील रॉयल व्हिक्टोरिया पार्कमध्ये शूट केलं होतं. त्यांनी आयुष्यात कधी अशी व्यक्ती पाहिली नव्हती. 

या व्हिडीओला आतापर्यंत १७ हजार व्ह्यूज १४३ पेक्षा जास्त लाइक्स आणि २४३ पेक्षा जास्त शेअर मिळाले आहेत. तर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत. एकाने लिहिले की, झाडावर चढणार व्यक्ती हा जीनिअस आहे.

यात तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसली आहे. असा अंदाज व्यक्त केला गेला की, तो ६० फूट उंचीवर आहे. व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती म्हणते की, अखेर तो तिथे पोहोचला कसा? मला वाटतं त्याच्या जवळही दुर्बीण आहे. तसा हा  सोशल डिस्टंसिंगचा चांगला फंडा आहे. झाडाच्या शेंड्यावर पिकनिकचा आनंद घेत आहे. काय व्यक्ती आहे.

अद्भूत असे काही! एक असा फोटोग्राफर ज्याला वाघ, बिबटे अन् हत्तीच नाही तर सापसुद्धा 'पोज' देतात!

बापरे! भरधाव ट्रेनसमोर जीवघेणा खेळ अन्...; अंगावर काटा आणणारा Video जोरदार व्हायरल 

Web Title: Man enjoys picnic at top of 60ft tree video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.