Viral Video : 'अशी' खतरनाक असते भौ बिबट्याची स्टाईल, व्हिडीओ एकदा बघाल बघतच रहाल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 13:31 IST2020-06-09T13:24:00+5:302020-06-09T13:31:20+5:30

बिबट्याचे अनेक भारी व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर नेहमीच बघत असाल, पण असा व्हिडीओ पहिल्यांदाच बघाल.

Viral Video : Leopard jump tree to tree will shock you | Viral Video : 'अशी' खतरनाक असते भौ बिबट्याची स्टाईल, व्हिडीओ एकदा बघाल बघतच रहाल....

Viral Video : 'अशी' खतरनाक असते भौ बिबट्याची स्टाईल, व्हिडीओ एकदा बघाल बघतच रहाल....

बिबट्यांचे कितीतरी व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. प्रत्येक व्हिडीओत तो काहीना काही वेगळं करताना दिसतो. कुठे एखाद्या झाडावर भरभर चढताना दिसतो तर कुठे तो वाऱ्याच्या वेगाने धावताना दिसतो. असाच एक भारी व्हिडीओ समोर आला आहे.

यात तो एका झाडाहून दुसऱ्या झाडावर झेप घेताना दिसतोय. विनित नावाच्या ट्विटर यूजरने हा व्हिडीओ शेअर केलाय. त्याला त्याने कॅप्शन दिलंय, 'स्ट्रेंथ, स्पीड आणि सेफ्टी'. या व्हिडीओत एक बिबट्या झाडावर चढताना आणि एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झेप घेताना दिसतो.

सामान्यपणे बिबट्याची अशी झेप बघायला मिळत नाही. तो जास्तकरून धावताना बघायला मिळतो. त्यामुळे त्याचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियातील लोक अवाक् झाले आहेत. अनेकजण बिबट्याचा हा भन्नाट व्हिडीओ शेअर करत आहेत.

काही दिवसांपूर्वी बिबट्याचा असाच एक वेगळा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात बिबट्या दोन पायांवर उभा होऊन जंगलात पिल्लांना शोधत आहे.

बिबट्या अशाप्रकारे दोन पायांवर दिसणे हाही एक अद्भूत क्षण आहे. कारण तो असाही सामान्यपणे बघायला मिळत नाही. 

Viral Video : बिबट्याला धावताना, झाडावर चढताना अनेकदा पाहिलं असेल, पण त्याचं असं रूप कधी पाहिलं नसेल...

खतरनाक! अंगावर आलेला सिंह म्हशीने असा काही घेतला शिंगावर, बघा थरारक व्हिडीओ...

Web Title: Viral Video : Leopard jump tree to tree will shock you