Buffalo launches predator into the air watch viral video api | खतरनाक! अंगावर आलेला सिंह म्हशीने असा काही घेतला शिंगावर, बघा थरारक व्हिडीओ...

खतरनाक! अंगावर आलेला सिंह म्हशीने असा काही घेतला शिंगावर, बघा थरारक व्हिडीओ...

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात एक म्हैस कशाप्रकार सिंहांवरून उडी घेऊन पळून जाते हे बघायला मिळालं. आता सिंह आणि म्हशीचा दुसरा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यातही जंगली म्हैस सिंहाला धोबीपछाड देताना दिसत आहे. एक सिंह म्हशीवर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसलेला असतो आणि अचानक म्हशीवर हल्ला करतो. पण म्हैस सिंहाला शिंगांवर घेते आणि सिंहाला फेकते.

हा व्हायरल व्हिडीओ आयएफएस सुशांता नंदा यांनी शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मनुष्य सिंहाला जंगलाचा राजा मानतात. पण या म्हशीला काहीही फरक पडत नाही की, राजा कोण आहे'.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, आपल्या शिकारीवर लक्ष ठेवत सिंह झुडपात बसला होता. म्हैस जशीही पुढे जायला लागते सिंह तिच्यावर हल्ला करतो. म्हैस सिंहाला लगेच आपल्या शिंगांवर घेते आणि फेकून देते. काही सेकंद सिंह हवेतच राहतो. 31 सेकंदाच्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, म्हशीने जंगलाच्या राजाला धोबीपछाड दिलंय.

या व्हिडीओत आतापर्यंत 13 हजारपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत आणि 1.2 हजार लाइक्स मिळाले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Buffalo launches predator into the air watch viral video api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.