Viral Video : Leopard does an incredible backflip to catch monkey api | थरारक! झाडावर बॅक फ्लिप घेऊन बिबट्याने केली शिकार, असा व्हिडीओ आधी कधी पाहिला नसेल!

थरारक! झाडावर बॅक फ्लिप घेऊन बिबट्याने केली शिकार, असा व्हिडीओ आधी कधी पाहिला नसेल!

काही दिवसांपूर्वी एका बिबट्याचा एक भारी व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात बिबट्या त्याच्यापेक्षा वजनाने दुप्पट असलेलं हरिण शिकार करून झाडावर कसं झरझर घेऊन जातं हे बघायला मिळालं. आता बिबट्याचा एक दुसरा व्हिडीओ व्हायरल झाला असून बिबट्याने शिकारीसाठी घेतलेली थक्क करणारी झेप यात बघायला मिळते.

हा थरारक व्हिडीओ आयएफएस सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं आहे की, 'शिकार पकडण्यासाठी बिबट्याने भारी फ्लिप मारली. सामान्यपणे बिबटे हे त्यांची शिकार जमिनीवरच पकडतात आणि शिकारीची मान पकडून त्यांना मारतात. इथेही तेच केलंय. पण ज्याप्रकारे उडी घेतली ती फार बघायला मिळत नाही'.

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, बिबट्या एका माकडाच्या मागे झाडावर चढला. जसंही माकड दुसऱ्या फांदीवर जाण्यासाठी उडी घेतं तेव्हा बिबट्या बॅक फ्लिप मारून माकडाला पडकतो.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला असून यावर लोक कमेंटही करत आहेत. कारण त्यांनीही बिबट्याचा शिकार करतानाचा असा अद्भूत व्हिडीओ पाहिला नाहीये.

Web Title: Viral Video : Leopard does an incredible backflip to catch monkey api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.