किंग कोब्रा आणि मुंगसाच्या फाइटचा खतरनाक व्हिडीओ, बघा कुणी मारली बाजी आणि कोणी गमावला जीव...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 17:11 IST2022-06-08T17:10:12+5:302022-06-08T17:11:30+5:30
Fight Between Cobra And Mongoose: एक मुंगूस आणि सापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंगसाने संतापलेल्या किंग कोब्रासोबत पंगा घेण्याचं काम केलं आणि मग असं काही झालं जे बघण्यासारखं आहे.

किंग कोब्रा आणि मुंगसाच्या फाइटचा खतरनाक व्हिडीओ, बघा कुणी मारली बाजी आणि कोणी गमावला जीव...
Fight Between Cobra And Mongoose: किंग कोब्राचं नाव ऐकताच अनेकांना घाम फुटतो. अशात जेव्हा किंग कोब्रा फणा काढून बसलेला असेल तर त्याच्या रागाचा अंदाज घेतला जाऊ शकतो. साप आणि मुंगसाचं वैर हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांचा आमना-सामना झाल्यावर काय होतं याचीही कल्पना सर्वांनाच आहे. असाच एक मुंगूस आणि सापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंगसाने संतापलेल्या किंग कोब्रासोबत पंगा घेण्याचं काम केलं आणि मग असं काही झालं जे बघण्यासारखं आहे.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक किंग कोब्रा फणा काढून रस्त्याच्या मधोमध बसलाय. अशात एक मुंगूस तिथे एन्ट्री घेतं आणि किंग कोब्रासोबत पंगा घेतं. त्यानंतर जे होतं ते बघून अर्थातच अंगावर काटा येतो. कारण सामान्यपणे हे दोन जीव समोर आले की, काय होतं याचा अंदाज सर्वांनाच आहे.
भर रस्त्यात किंग कोब्रा आणि मुंगसाची फाइट सुरू होते. दोघेही एकमेकांवर जोरदार हल्ला करतात. दोघेही एकमेकांचा जीव घेण्यासाठी उतावळे आहेत. दोघांपैकी एकही जण हार मानण्यास तयार नाही. रस्त्यावर असलेले लोक आपापल्या गाड्यांवर बसून दोघांची फाइट बघत आहेत. कुणीही समोर जाण्याची हिंमत केली नाही.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 4 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं. व्हिडीओच्या शेवटी तुम्ही बघू शकता की, मुंगसाने या फाइटमध्ये बाजी मारली आणि किंग कोब्राला मारून आपल्या तोंडात धरून घेऊन गेला.