VIDEO : सोफ्यावर गेम खेळत असलेल्या मुलाजवळ पोहोचला मोठा साप, पण पडला नाही काहीच फरक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 18:09 IST2021-11-10T18:03:54+5:302021-11-10T18:09:32+5:30
Social Viral : काही सेकंदाचा हा व्हिडीओ लोकांना हैराण करणारा आहे. कारण यात साधारण २० फूट लांब साप घरात सहजपणे फिरताना दिसत आहे.

VIDEO : सोफ्यावर गेम खेळत असलेल्या मुलाजवळ पोहोचला मोठा साप, पण पडला नाही काहीच फरक
Social Viral : सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ असतात जे बघून त्यांच्यावर सहजपणे विश्वास ठेवणं अवघड होतं. काही व्हिडीओ असेही असतात जे बारकाईने एकदा नाही तर दोन तिनदा बघितले जातात. मगच त्यावर विश्वास ठेवला जातो. चला आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवतो, ज्यात एका विशाल अजगर सोफ्यावर पडलेला दिसत आहे. सापच नाही तर सोफ्यावर एक मुलगाही आहे जो व्हिडीओ गेम खेळत आहे. तो सापाला अजिबात न घाबरता शांतपणे पडून आहे.
काही सेकंदाचा हा व्हिडीओ लोकांना हैराण करणारा आहे. कारण यात साधारण २० फूट लांब साप घरात सहजपणे फिरताना दिसत आहे. घरातील जमिनीपासून ते सोफ्यापर्यंत हा साप घरात आरामात फिरत आहे. तेच त्याच्याजवळ एक लहान मुलगा झोपलेला आहे. तो अजिबात न घाबरता मोबाइलवर शांतपणे गेम खेळत आहे. त्याच्या हावभावावरून हे लक्षात येतं की, त्याची सापासोबत चांगली ओळख आहे.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, साप सोफ्यावर अगदी त्याला चिकटून झोपलेला आहे. यानंतर फ्रेममध्ये जे काही दिसतं ते हैराण करणारं आहे. मुलाच्या बाजूलाच सापाचं तोंड आहे आणि तो मुलाला काहीच नुकसान पोहोचवत नाही. मात्र, व्हिडीओ पाहून लोकांना नक्कीच भीती वाटते. हा व्हिडीओ पाहून अनेकांना घाम फुटला आहे तर अनेकांची झोप उडाली आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर royal_pythons नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे.