झुकेगा नही..., गॅस संपला, चूल मांडायला सुरुवात...! हॉटेल मालक लगेचच कामाला लागले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:57 IST2026-03-11T15:39:09+5:302026-03-11T15:57:05+5:30
इराण आणि अमेरिका युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनी मार्ग बंद करण्यात आला आहे. याचा फटका आता जगाला बसण्यास सुरुवात झाली आहे.

झुकेगा नही..., गॅस संपला, चूल मांडायला सुरुवात...! हॉटेल मालक लगेचच कामाला लागले
मागील काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनी मार्ग बंद करण्यात आला आहे. याचा फटका आता जगाला बसण्यास सुरुवात झाली आहे. भारतातही गॅसचा मोठा तुटवडा पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आता खबरदारी म्हणून केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस पुरवठा थांबवला आहे. यामुळे आता हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आता अनेक ठिकाणचे हॉटेल व्यावसायिक पुन्हा एकदा पारंपारिक चुलीकडे वळत आहेत, याबाबत एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये एक हॉटेल व्यावसायिक आपल्या हॉटेल समोर चुल तयार करत असल्याचे दिसत आहे. देशात गॅस मागील दहा वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आधी देशातील अनेक हॉटेलमध्ये चुली पाहायला मिळत होत्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लखनऊ में चूल्हा बनकर तैयार हो गया है. अब हम हमारी जड़ों की तरफ लौट रहे हैं.
— Ranvijay Singh (@ranvijaylive) March 11, 2026
पश्चिमी सभ्यता ने हमें खराब कर दिया था. गैस सिलेंडर की वजह से लोग आलसी हो गए थे.
अब चूल्हा जलेगा और लकड़ी जुटाने की मेहनत होगी, इससे होगा स्वास्थ्य लाभ.
जय हो pic.twitter.com/g71y5VgHw5
केंद्र सरकारनेही ५ मार्चला अधिसूचना काढून व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅसवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्यासह देशभरात हॉटेल व्यावसायिकांना फटका बसला. सिलिंडर मिळण्यास विलंब होत असल्याने आणि भीतीमुळे नागिकांनी देखील मंगळवारी गॅस पुरवठा केंद्रांवर रांगा लावल्या होत्या.
मुंबईतील अनेक भागात व्यावसायिक एलपीजीचा तुटवडा जाणत आहे. त्याचा जवळपास ५० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंटला थेट फटका बसणार आहे. त्यातच लहान रेस्टॉरंटकडे एलपीजी गॅसचा मर्यादीत साठा आहे. येत्या दोन दिवसात गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास अनेक रेस्टॉरंट तात्पुरती बंद करावी लागण्याची शक्यता आहे.