Viral Video : स्टेजवरच सुटला नवरदेवाचा पायजमा अन् खदकन हसली नवरी....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 16:20 IST2021-07-05T16:19:57+5:302021-07-05T16:20:31+5:30
आता व्हायरल झालेला व्हिडीओ (Funny Video of Groom) फारच चर्चेचा विषय ठरत आहे. कारण इतर व्हिडीओपेक्षा यात फार वेगळाच प्रकार घडला आहे.

Viral Video : स्टेजवरच सुटला नवरदेवाचा पायजमा अन् खदकन हसली नवरी....
सोशल मीडियावर अलिकडे लग्नसमारंभातील (Wedding Videos on Social Media) अनेक मजेदार व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. लग्न म्हटलं की, अनेक मजेदार गोष्टी, गमती-जमती घडत असतात. कधी हार एकमेकांमध्ये अडकतात तर कधी स्टेजवर भलंतच काही घडतं. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात नवरदेवाचा पायजामा सुटलाय.
आता व्हायरल झालेला व्हिडीओ (Funny Video of Groom) फारच चर्चेचा विषय ठरत आहे. कारण इतर व्हिडीओपेक्षा यात फार वेगळाच प्रकार घडला आहे. यात बघायला मिळतं की, स्टेजवर नवरदेव आणि नवरी (Groom and Bride) एकमेकांना हार घालत आहेत. नवरदेवानं नवरीला वरमाला घातली. मात्र यानंतर असं काही झालं जे पाहून तुम्ही पोटधरून हसाल. (हे पण बघा : VIDEO : सर्वांसमोर नवरदेवाने नवरीसोबत केलं असं काही, बघतच राहिले पाहुणे)
तुम्ही पाहू शकता की नवरदेव आणि नवरी एकमेकांना वरमाला घालताना अशात त्यानंतर नवरदेवाला त्याचा पायजमा सुटलेला दिसतो. हे पाहून नवरीही हसू लागते आणि उपस्थित पाहुणेही हसू लागतात. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ ‘official_niranjanm87’ नावाच्या यूजरनं शेअर केला आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंटही करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'हे दृश्य इतकं मजेशीर आहे की हे पाहून मी खूप हसलो'. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं की, 'लग्नाचा असा व्हिडिओ मी पहिल्यांदाच पाहिला'.