Viral Video : कचऱ्यातून काढलं २६ लाखांचं सोनं! जुन्या सिम कार्डचा असा वापर पाहून जग चक्रावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 23:32 IST2026-02-04T23:30:24+5:302026-02-04T23:32:32+5:30

कियाओचा हा व्हिडिओ पाहून अनेकजण आता जुने सिम कार्ड गोळा करू लागले आहेत. मात्र, कियाओने सर्वांना एक गंभीर इशारा दिला आहे.

Viral Video: Gold worth 26 lakhs recovered from garbage! The world was shocked to see such use of old SIM cards | Viral Video : कचऱ्यातून काढलं २६ लाखांचं सोनं! जुन्या सिम कार्डचा असा वापर पाहून जग चक्रावलं

Viral Video : कचऱ्यातून काढलं २६ लाखांचं सोनं! जुन्या सिम कार्डचा असा वापर पाहून जग चक्रावलं

आपल्या घरातील जुने मोबाईल, बिघडलेली सिम कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक कचरा आपण कचरा समजून फेकून देतो. पण याच कचऱ्यातून एका व्यक्तीने तब्बल २६ लाख रुपयांचे सोने काढून सर्वांना थक्क केले आहे. चीनच्या गुआंगडोंग प्रांतातील हुइझोउ शहरात राहणाऱ्या कियाओ नावाच्या तरुणाने हा पराक्रम केला असून, सध्या तो सोशल मीडियावर 'आधुनिक किमयागार' म्हणून प्रसिद्ध झाला आहे.

नेमका प्रयोग काय? 

कियाओ हा व्यवसायाने धातू शुद्धीकरण क्षेत्रातील तज्ज्ञ आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो ५० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने शेकडो जुने सिम कार्ड आणि टेलिकॉम चिप्स एका केमिकलने भरलेल्या ड्रममध्ये टाकले. त्यानंतर विविध रासायनिक प्रक्रिया, उच्च तापमानावर धातू वितळवणे आणि गाळणे यांसारख्या पायऱ्या पार केल्यानंतर त्याच्या हाती शुद्ध सोन्याचा गोळा लागला.

१९१ ग्रॅम सोनं आणि २६ लाखांची कमाई! 

कियाओने या प्रयोगातून सुमारे १९१ ग्रॅम सोने मिळवले आहे. भारतीय चलनात याची किंमत अंदाजे २६ लाख रुपये इतकी आहे. मात्र, त्याने हे स्पष्ट केले की हे सर्व सोने केवळ सिम कार्डमधून आलेले नाही. यासाठी त्याने जवळपास २ टन इलेक्ट्रॉनिक कचरा आणि टेलिकॉम इंडस्ट्रीमधील वेस्ट चिप्सचा वापर केला. सिम कार्ड आणि बँक कार्डच्या चिप्सवर गंज लागू नये आणि संपर्क नीट व्हावा, यासाठी त्यावर सोन्याचा अत्यंत पातळ थर दिलेला असतो. एका कार्डमध्ये सोन्याचे प्रमाण नगण्य असले, तरी मोठ्या प्रमाणात कचरा जमा केल्यास त्यातून मोठे उत्पन्न मिळू शकते, हे त्याने सिद्ध केले.

'अल्केमिस्ट'ची चाहत्यांना महत्त्वाची चेतावणी 

कियाओचा हा व्हिडिओ पाहून अनेकजण आता जुने सिम कार्ड गोळा करू लागले आहेत. मात्र, कियाओने सर्वांना एक गंभीर इशारा दिला आहे. "हा प्रयोग केवळ व्हिडिओ पाहण्याइतका सोपा नाही. यासाठी रसायनांचे सखोल ज्ञान आणि कायदेशीर परवान्याची गरज असते," असे त्याने म्हटले आहे.

तुम्हीही करोडपती होऊ शकता का? 

कचऱ्यातून सोने काढण्याची ही कल्पना जितकी आकर्षक वाटते, तितकीच ती धोकादायकही आहे. यात वापरली जाणारी रसायने विषारी आणि जीवघेणी ठरू शकतात. अनेक देशांमध्ये वैयक्तिक स्तरावर ई-कचऱ्यावर प्रक्रिया करणे आणि सोने काढणे हा कायदेशीर गुन्हा ठरू शकतो. योग्य उपकरणांशिवाय हा प्रयोग केल्यास स्फोट होण्याचा किंवा आरोग्यास गंभीर इजा होण्याचा धोका असतो.

Web Title : इलेक्ट्रॉनिक कचरे और पुराने सिम कार्ड से आदमी ने लाखों का सोना निकाला।

Web Summary : एक चीनी आदमी ने रासायनिक प्रक्रियाओं का उपयोग करके इलेक्ट्रॉनिक कचरे और पुराने सिम कार्ड से ₹26 लाख का सोना निकाला। उन्होंने रसायनों के खतरों और संभावित कानूनी मुद्दों के कारण विशेषज्ञता के बिना नकल करने के खिलाफ चेतावनी दी है।

Web Title : Man extracts gold worth millions from e-waste and old SIM cards.

Web Summary : A Chinese man extracted gold worth ₹26 lakhs from electronic waste and old SIM cards using chemical processes. He cautions against imitating without expertise due to the dangers of the chemicals involved and potential legal issues.