VIDEO : तरूणीचा मूर्खपणा तिलाच पडला महागात, दुसऱ्याला पाडणार इतक्यात स्वत:च....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 13:40 IST2022-11-08T13:39:38+5:302022-11-08T13:40:34+5:30
व्हिडीओत दोन बाइक आजूबाजूला जाताना दिसत आहेत. रस्त्याच्या एका बाजूने एक पुरूष आणि एक महिला एका स्कूटीवरून जात आहेत. तर दुसरी बाइक एक महिला चालवत होती.

VIDEO : तरूणीचा मूर्खपणा तिलाच पडला महागात, दुसऱ्याला पाडणार इतक्यात स्वत:च....
Girl Funny Video: कधी कधी काही लोक असं काही वागतात त्याचा त्यांनाच वाईट परिणाम भोगावा लागतो. म्हणजे एखादी व्यक्ती जर कुणाबाबत चुकीचा विचार करत असेल तर तीच व्यक्ती उलट फसते. हेच दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका तरूणीने विचार केला की, दुसऱ्या बाईकवर असलेल्या व्यक्तीला लाथ मारून खाली पाडेल, पण तिच्यासोबत असं काही घडलं की, ते बघून तुम्ही पोटधरून हसाल.
व्हिडीओत दोन बाइक आजूबाजूला जाताना दिसत आहेत. रस्त्याच्या एका बाजूने एक पुरूष आणि एक महिला एका स्कूटीवरून जात आहेत. तर दुसरी बाइक एक महिला चालवत होती. पुरूषाच्या मागे बसलेली महिला दुसऱ्या बाइकवर असलेल्या महिलेला लाथ मारण्याचा प्रयत्न करताना दिसते. पण तिला वाटतं तसं काही घडत नाही. लाथ मारणाऱ्या महिलेचा बॅलन्स जातो आणि ती गाडीवरून धडामकन खाली पडते.
व्हिडीओत दुसऱ्या गाडी लाथ मारणाऱ्या तरूणीची लोक सोशल मीडियावर खिल्ली उडवत आहेत. कारण ती स्वत:च गाडीवरून पडली. सगळ्यात हैराण करणारी बाब ही आहे की, जिला तिने लाथ मारून पाडण्याचा प्रयत्न केला ती न थांबता पुढे निघून गेली. तर खाली पडलेल्या तरूणीसोबतचा पुरूष थोडा समोर जाऊन थांबला.
एका यूजरने लिहिलं की, याला म्हणतात तत्काळ कर्म. एका यूजरने लिहिलं की, बॅगमुळे तरूणीला काही जखम झाली नाही. पण जास्तीत जास्त लोकांनी तिची खिल्ली उडवली. दुसऱ्यांचा वाईट विचार करणाऱ्यांसोबत असंच होतं हेही सांगितलं.