Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 16:38 IST2025-09-02T16:38:17+5:302025-09-02T16:38:55+5:30

चित्रपटांमध्ये तुम्ही प्रेमात वेड्या झालेल्या प्रियकराला अनेक विचित्र गोष्टी करताना पाहिले असेल, पण असाच एक प्रकार प्रत्यक्षात देखील समोर आला आहे.

Viral Video: Girlfriend's phone was constantly busy, look what the angry boyfriend did! | Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!

Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!

चित्रपटांमध्ये तुम्ही प्रेमात वेड्या झालेल्या प्रियकराला अनेक विचित्र गोष्टी करताना पाहिले असेल, पण असाच एक प्रकार प्रत्यक्षात देखील समोर आला आहे. एका प्रियकराने प्रेमात वेडं होऊन अख्ख्या गावाचा वीजपुरवठा कापून टाकला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नेमकं काय घडलं?

गर्लफ्रेंडचा फोन व्यस्त असल्यामुळे संतापलेल्या एका प्रियकराने चक्क विजेच्या खांबावर चढून तारा तोडून टाकल्या. यामुळे संपूर्ण गावातील वीजपुरवठा खंडित झाला. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण हातात मोठा प्लायर घेऊन विजेच्या खांबावर चढलेला दिसत आहे. खांबाला अनेक तारा बांधलेल्या असून, तो तरुण त्या तोडताना दिसत आहे, ज्यामुळे परिसरातील वीज खंडित होते. हा व्हिडीओ एका एक्स अकाऊंटवरून  शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "गर्लफ्रेंडचा फोन व्यस्त असल्यामुळे संतापलेल्या प्रियकराने तिच्या गावाचा वीजपुरवठा खंडित केला." हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लोक यावर विविध आणि मजेदार कमेंट्स करत आहेत. मात्र, हा व्हिडीओ नेमका कुठे आणि कधीचा आहे, याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्स अनेक मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, "प्रेमात वेडे झालेले अनेकजण पाहिले, पण असा वेडा पहिल्यांदाच पाहिला." दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे, "आशिक स्वतःची नस कापतो, याने तर अख्ख्या गावाच्याच तारा कापल्या."

काही लोकांनी तर त्याला बॉलिवूड चित्रपट पाहणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी त्याची तुलना 'सैराट' सारख्या चित्रपटांशी केली आहे. एका युजरने त्याला 'खरा सैराट' असेही म्हटले आहे.

Web Title: Viral Video: Girlfriend's phone was constantly busy, look what the angry boyfriend did!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.