VIDEO: बारमध्ये मुलीनं केला अजय देवगण स्टाईल स्टंट; ग्राहकांना बसला धक्का, एकदा पाहाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 16:05 IST2022-01-19T16:04:31+5:302022-01-19T16:05:10+5:30
सोशल मीडिया हे एक असं व्यासपीठ आहे की जिथं रोज काही ना काही व्हायरल होत असतं. यात असे अनेक व्हायरल व्हिडिओ असतात की जे पाहून अनेकांचं मनोरंजन होतं.

VIDEO: बारमध्ये मुलीनं केला अजय देवगण स्टाईल स्टंट; ग्राहकांना बसला धक्का, एकदा पाहाच...
सोशल मीडिया हे एक असं व्यासपीठ आहे की जिथं रोज काही ना काही व्हायरल होत असतं. यात असे अनेक व्हायरल व्हिडिओ असतात की जे पाहून अनेकांचं मनोरंजन होतं. तर काही व्हिडिओ आश्चर्याचा धक्का देऊन जातात. असाच एक जबरदस्त व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.
एका रेस्टॉरंट आणि बारमध्ये एका तरुणीनं केलेला स्टंट सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. एक तरुणी बारमध्ये बॉलीवूड अभिनेता अजय देवगण स्टाइल स्टंट करते आणि ते पाहून ग्राहक देखील आश्चर्यचकीत झालेला पाहायला मिळतात. स्टंट केल्यानंतर लगेच तरुणी ड्रींक देखील संपवते. हे पाहून एका ग्राहकाला असा धक्का बसतो की त्याच्या हातातील ग्लास देखील खाली पडतो. युझर्स हा व्हिडिओ वारंवार पाहात असून मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जात आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका बारमध्ये शूट करण्यात आल्याचं दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला एक बार काऊंटर दिसतं. ज्यात काही ग्राहक आपलं ड्रिंक संपवून तिथून जाताना दिसून येतात. इतक्यात एक तरुणी अचानक धावत येऊन अजय देवगणच्या स्टाईलमध्ये दोन खुर्च्यांवर आपले दोन्ही पाय ठेवून बसते आणि स्टंट केल्यानंतर बार काऊंटरवरील ड्रिंक देखील एका घोटात संपवते. हे पाहून एक ग्राहक आश्चर्यचकीत होऊन जातो आणि त्याच्या हातातील काचेचा ग्लास खाली पडतो, असं व्हिडिओत दिसत आहे.
संबंधित व्हिडिओत दिसणारी तरुणी जिमनॅस्टीक खेळाडू असल्याचं सांगितलं जात आहे. अजब आणि सर्वांना अवाक् करुन सोडणाऱ्या स्टंट व्हिडिओंमुळे ती सोशल मीडियात नेहमी चर्चेत असते. तिच्या इस्टाग्राम अकाऊंटवर अशा अनेक स्टंटचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. रुणी उझबेकिस्तानची असून सोशल मीडियात ती प्रचंड लोकप्रिय असल्याचंही दिसून येतं. इन्स्टाग्रामवर तिचे ५ लाख २९ हजार फॉलोअर्स आहेत.