Viral Video: फायर ब्रिगेड विसरा, या तंत्रज्ञानाने काही मिनीटात आग आटोक्यात येणार, पहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 16:19 IST2022-05-25T16:19:09+5:302022-05-25T16:19:52+5:30
एखादी इमारत किंवा कुठल्याही परिसरात आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण केले जाते. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ आग आटोक्यात आणतात. पण, आता यासाठी एका नवीन तंत्रज्ञनाचा वापर होत आहे.

Viral Video: फायर ब्रिगेड विसरा, या तंत्रज्ञानाने काही मिनीटात आग आटोक्यात येणार, पहा Video
Viral Video: एखादी इमारत किंवा कुठल्याही परिसरात आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण केले जाते. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ आग आटोक्यात आणतात. पण, काहीवेळा अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास थोडा वेळ होतो. अशा स्थितीत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याशिवाय उंच इमारतीत आग लागल्यास ती विझविण्यातही अग्निशमन दलाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. पण, आता या सर्व अडचणी तंत्रज्ञानाद्वारे दूर केल्या जाणार आहेत.
तंत्रज्ञनाच्या मदतीने आगीवर नियंत्रण
अग्निशमन दलाच्या जवानांना पटकन आणि सुरक्षितरित्या आग विझविण्यात यावी, यासाठी तंत्रज्ञानाने समस्येवर उपाय शोधला आहे. यामुळे आआता आगही काही मिनिटांतच विझवली जाईल आणि कुणाला इजाही होणार नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने आग विझवताना दाखवण्यात आले आहे.
आग विझविण्यासाठी ड्रोनचा वापर
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका 10 मजली इमारतीमध्ये खालपासून वरपर्यंत भीषण आग लागली असून, ती विझवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येतोय. ड्रोनला पाणी किंवा गॅस असलेल्या पाईपला जोडण्यात आले आहे, ज्यातून समोरून पाणी किंवा वायू बाहेर पडत आहेत. हे ड्रोन हवेत उडून इमारतीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर खाली अग्निशमन दलाचे जवान उभे राहून ड्रोन नियंत्रित करत आहेत.
#FireBrigades will be past #Drones in FireFighting 💐💐 pic.twitter.com/TAmyK9sKt8
— Rupin Sharma (@rupin1992) May 23, 2022
IPS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ
या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अत्यंत भीषण आगही सहज विझवता येते आणि त्यात जीवाला धोका नसतो. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत, कारण क्वचितच कोणी ड्रोनने इमारतीला लागलेली आग विझवताना पाहिले असेल. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'फायर ब्रिगेड जुनी झाली आहे, आता ड्रोन फायर फायटरचे युग आले.'