Viral Video: सोशल मिडियावर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होतात. काही मनोरंजक असतात, तर काही पाहून धक्का बसतो. सध्या असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात एका बैलाला जाणूनबुजून कारखाली चिरडून मारल्याचे दिसते. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आरोपीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
व्हिडिओत काय दिसते?
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, रस्त्यावर एक बैल हळूहळू चालत आहे. काही वेळानंतर त्याच्या मागेून येणाऱ्या गाडीने आधी बैलाला ठरक्र मारली, ज्यामुळे बैल खाली पडतो. त्यानंतर गाडीचा ड्रायव्हर परत येऊन रस्त्यावर पडलेल्या बैलाच्या अंगावरुन कार चढवतो. ही थरकाप उडवणारी घटना राजस्थानच्या सिका (सीकर) जिल्ह्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
लोकांचा संताप
हा व्हिडिओ एक्स (पूर्वीच्या ट्विटर) वर @nehraji77 ह्या अकाउंवटवरुन शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत 2.11 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोकांनी या क्रूर घटनेवर संताप व्यक्त केला आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अनेक युजर्सनी आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी केली.
Web Summary : A viral video shows a bull deliberately run over by a car in Rajasthan's Sikar district. The driver first hit the bull, then drove over it, sparking outrage online. Users are demanding strict punishment for the perpetrator.
Web Summary : वायरल वीडियो में राजस्थान के सीकर जिले में एक बैल को जानबूझकर कार से कुचलते हुए दिखाया गया है। ड्राइवर ने पहले बैल को टक्कर मारी, फिर उसे रौंद दिया, जिससे ऑनलाइन आक्रोश फैल गया। यूजर्स अपराधी को सख्त सजा देने की मांग कर रहे हैं।