Viral Video: खिडकी तोडून घरातील किचनमध्ये शिरला होता हत्ती, जाण्याआधी केलं त्यानं अविश्वसनीय काम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 16:40 IST2021-12-17T16:39:56+5:302021-12-17T16:40:43+5:30
Elephant Viral Video : व्हायरल झालेल्या व्हिडीओ बघू शकता की, किचन खिडकीतून आत शिरून हत्ती काय करतो. तो खिडकीतून थोडासा आत शिरून खाण्या-पिण्याच्या वस्तू शोधू लागतो.

Viral Video: खिडकी तोडून घरातील किचनमध्ये शिरला होता हत्ती, जाण्याआधी केलं त्यानं अविश्वसनीय काम!
हत्ती हा सामान्यपणे शांत असलेलाच बघायला मिळतो. पण जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो सगळं उद्ध्वस्त करून ठेवतो. हत्ती दिसल्यावर लोक चार पावलं मागेच राहणं पसंत करतात. सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झालेल्या एका व्हिडीओत असंच काही बघायला मिळतं. व्हायरल झालेल्या व्हिडीओ बघू शकता की, किचन खिडकीतून आत शिरून हत्ती (Elephant Viral Video) काय करतो. तो खिडकीतून थोडासा आत शिरून खाण्या-पिण्याच्या वस्तू शोधू लागतो.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे हत्ती किचनमध्ये घुसून सगळं फेकफाक करतो. हत्तीला भूक लागल्याने तो खाण्यासाठी काहीतरी शोधत आहे. पण काहीतरी शोधण्यासाठी त्याने किचनमधील साहित्य फेकलं. त्यावेळी घरातील व्यक्तीने त्याला हाकलण्याचा खूप प्रयत्न केला. पण हत्ती काही जाईना. त्यानंतर हत्तीने एक असं काम केलं ज्यावर विश्वास बसणार नाही.
The elephant is so homely that it wants to close the cupboard before leaving… pic.twitter.com/Yn2jf0eoDD
— Susanta Nanda IFS (@susantananda3) December 15, 2021
हत्ती जाण्याआधी त्याने किचनमधील उघडलेलं कपबोर्ड बंद करून जातो. ट्विटरवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. काही सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत ३० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर या व्हिडीओला १४०० लोकांनी लाईक केलंय. तसेच २०५ पेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केलाय. या व्हिडीओच्या कॅप्शनला त्यांनी लिहिलं की, 'हा हत्ती पूर्णपणे घरातील सदस्यासारखा वाटतोय. जो जाण्याआधी कबर्ड बंद करून गेला'.