आधी धरून आपटलं अन् मग...; 82 वर्षीय आजोबांनी कार चोरट्याला शिकवला धडा, पाहा व्हायरल व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 20:16 IST2021-04-05T20:13:36+5:302021-04-05T20:16:28+5:30
Viral Video : एका मुलाने एका आजोबांची कार पळवण्याचा प्रयत्न केला पण आजोबांनीसुद्धा त्याला चांगलाच धडा शिकवला आहे.

आधी धरून आपटलं अन् मग...; 82 वर्षीय आजोबांनी कार चोरट्याला शिकवला धडा, पाहा व्हायरल व्हिडीओ
कोरोनाची माहामारी असो किंवा काहीही. चोरी, दरोड्याच्या प्रकारांमध्ये नेहमीच वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. लहान मुलं, अपंग, वयस्कर लोक आपलं काहीही वाकडं करू शकत नाही असं अनेकदा चोरांना वाटतं. याचाच फायदा घेत चुकीची काम केली जातात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका मुलाने एका आजोबांची कार पळवण्याचा प्रयत्न केला पण आजोबांनीसुद्धा त्याला चांगलाच धडा शिकवला आहे.
ही घडना अमेरिकेच्या एटलांटामधील असल्याचं समोर आलं आहे. एका मुलाने 82 वर्षीय आजोबांची काळ पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर हल्लासुद्धा केला. आजोबांनी घाबरून न जाता त्या मुलाचा निर्भीडपणे सामना केला. त्यांनी या चोरट्यासोबत कशी फायटिंग केली ते तुम्ही पाहू शकता. सीसीटिव्ही कॅमेरात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.
इंडिया टाईम्सनं दिलेल्या माहतीनुसार एटलांटा पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता गॅस स्टेशनजवळ एक तरूण कुणाचीतरी वाट पाहत असल्याचं दिसतं आहे. पण खरंतर तो कुणाची वाट पाहत नाही आहे, तर कार चोरी करण्याच्या विचारात आहे. Viral News : कोविडबद्दल सुरू होती Zoom Meeting; अचानक नेत्याची बायको नग्नावस्थेत मागे उभी राहिली अन् मग....
वयस्कर कार मालकाला हेरून तो त्याच्या जवळ जातो. तो मुलगा वयस्कर व्यक्तीजवळ जाऊन त्याच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर ती व्यक्ती कारचा दरवाजा खोलून कारमध्ये काहीतरी शोधते तेव्हा तो मुलगा त्याच्या पाठीमागे जातो आणि त्याच्या हातातून काहीतरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान त्याचवेळी आजोबा इतर ठिकाणी मदत मागायलाही जाताना दिसतात तोपर्यंत तो मुलगा कार सोडून तिथून पळ काढतो. सध्या मुलगा फरार असून पोलिस या तरूणाचा शोध घेत आहेत. काय सांगता राव? औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली १ लाख रूपये किलोनं विकली जाणारी भाजी; IAS म्हणाले....