VIDEO: 'धुरंधर' फिव्हर सुरूच! चिमुरडीचा FA9LA गाण्यावरील जबरदस्त डान्स सोशल मीडियावर VIRAL
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:04 IST2025-12-30T14:02:33+5:302025-12-30T14:04:09+5:30
Small Girl Dance on FA9LA viral song: अक्षय खन्नाच्या सिग्नेचर स्टेप्स छोट्या मुलीने इतक्या मस्त केल्या आहेत की, नेटकरी तिचे कौतुक करत आहेत.

VIDEO: 'धुरंधर' फिव्हर सुरूच! चिमुरडीचा FA9LA गाण्यावरील जबरदस्त डान्स सोशल मीडियावर VIRAL
Small Girl Dance on FA9LA viral song: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील अक्षय खन्नाची एन्ट्री आणि त्यातील 'FA9LA' हे गाणे इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. अक्षय खन्नाच्या 'रेहमान डकैत' या पात्राने आणि त्याच्या हटके डान्स स्टेप्सनी चाहत्यांना वेड लावले असतानाच, आता एका चिमुरडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या चिमुरडीने अक्षय खन्नाच्या सिग्नेचर स्टेप्स इतक्या मस्त केल्या आहेत की, नेटकरी तिचे कौतुक करत आहेत.
चिमुरडीचा भन्नाट डान्स
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी 'धुरंधर' चित्रपटातील प्रसिद्ध 'FA9LA' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यात अक्षय खन्ना ज्याप्रमाणे शांतपणे आणि एका विशिष्ट स्वॅगमध्ये डान्स करतो, अगदी तशाच स्टेप्स करत ही चिमुरडी डान्स करताना दिसते. तिचे हावभाव आणि आत्मविश्वासाने भरलेल्या डान्स स्टेप्स पाहून अनेकांनी तिची तुलना खुद्द अक्षय खन्नाशी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. पाहा व्हिडीओ-
सोशल मीडियावर 'FA9LA'ची क्रेझ
बहारिनचा गायक 'फ्लिपरॅची' याने गायलेले हे गाणे सध्या इन्स्टाग्राम रिल्सवर ट्रेंडिंग आहे. अक्षय खन्नाचा या गाण्यावरील डान्स कोणताही सराव न करता 'ऑन द स्पॉट' केल्याचे बोलले जात आहे. यामुळेच या गाण्याला एक वेगळीच नॅचरल वाईब मिळाली आहे. या चिमुरडीच्या व्हिडिओने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, लहान मुलांमध्येही कलागुणांची कमतरता नाही आणि त्यांना बॉलीवूडच्या ट्रेंडची चांगलीच जाण आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणत आहेत की, ही चिमुरडी तर अक्षय खन्नालाही मागे टाकेल! काहींनी तिला 'छोटी रेहमान डकैत' असेही संबोधले आहे.