'या' गोड चिमुकलीच्या बोलण्याने सोशल मीडिया यूजर्सना लावलंय वेड, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 19:11 IST2021-07-22T19:06:36+5:302021-07-22T19:11:51+5:30

अनेक काही मुले इतके गोड बोलतात की, असं वाटतं त्यांनाच ऐकत रहावं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Viral Video) झाला आहे. 

Viral Video of cute baby girl people are watching again and again | 'या' गोड चिमुकलीच्या बोलण्याने सोशल मीडिया यूजर्सना लावलंय वेड, व्हिडीओ व्हायरल

'या' गोड चिमुकलीच्या बोलण्याने सोशल मीडिया यूजर्सना लावलंय वेड, व्हिडीओ व्हायरल

मुलींचे नखरे तुम्ही अनेकदा पाहिले असतील. खासकरून लहान मुलींचा अल्लडपणा भारीच असतो. त्यांचं बोलणं, त्यांचं हसणं, वागणं मनात घर करून जातं. लहान मुलांचं मन फार निर्मळ असतं. त्यांना जे वाटतं ते करतात. बोलतात. अनेक काही मुले इतके गोड बोलतात की, असं वाटतं त्यांनाच ऐकत रहावं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Viral Video) झाला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल चिमुकलीच्या (Cute Girl Video) व्हिडीओत बघू शकता की, एक गोड मुलगी कोल्ड ड्रिंक्स पित आहे. यादरम्यान तिची आत्या समोर बसून तिचे रिअॅक्शन रेकॉर्ड करत आङे. आत्या त्या मुलीला विचारते की, तू काय पितेय? तर ती 'पेप्सी' असं सांगते. यानंतर ती तिच्या आत्याला लाडात विचारते की, 'आत्या केस नीट करते..'

काही सेकंदात ती बेडवर तिची जागा बदलून बसते आणि म्हणते की, आत्या मी आंघोळ करून येऊ का? यावर तिची आत्या तिला म्हणते की, आता नाही बेटा थोड्या वेळाने. या चिमुकलीचं हे लाडात बोलणं लोकांना इतकं आवडत आहे की, व्हिडीओ व्हायरल झालाय. आतापर्यंत या व्हिडीओला ३६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर कियारा कपूरने शेअर केला आहे.
 

Web Title: Viral Video of cute baby girl people are watching again and again