मॅडमना जाऊ द्या! रस्त्यावर पत्नीच्या केसात गजरा माळत होता पती, तेव्हाच मधे आली गाय आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:36 IST2025-01-04T14:34:00+5:302025-01-04T14:36:07+5:30

Viral Video : अनेकदा एखादी गोष्टी करत असताना अचानक भलतंच काहीतरी घडतं, तसंच काहीसं या व्हिडिओत बघायला मिळालं.

Viral Video : Cow comes in middle of man putting gajra on wife hairs watch video | मॅडमना जाऊ द्या! रस्त्यावर पत्नीच्या केसात गजरा माळत होता पती, तेव्हाच मधे आली गाय आणि...

मॅडमना जाऊ द्या! रस्त्यावर पत्नीच्या केसात गजरा माळत होता पती, तेव्हाच मधे आली गाय आणि...

Viral Video : सोशल मीडिया नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हसवणारे, तर काही अवाक् करणारे असतात. तर काही व्हिडिओंवर विश्वासही बसत नाही. गमतीदार व्हिडीओ तर लोकांच्या जास्त आवडीचे असतात. सध्या असाच एक गमतीदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकदा एखादी गोष्टी करत असताना अचानक भलतंच काहीतरी घडतं, तसंच काहीसं या व्हिडिओत बघायला मिळालं.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती आपल्या पत्नीच्या केसांमध्ये गजरा माळत आहे. हे काम तो रस्त्यावर उभं राहून करत आहे. तेव्हाच अचानक एक गाय येते आणि दोघांच्या मधे येऊन त्यांना बाजूला करते व पुढे निघून जाते. हा क्षण पाहून लोक चांगलेच लोटपोट झाले आहेत. अनेकांनी अनेक मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. हा व्हिडीओ @nrv_emotions नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंट पोस्ट करण्यात आला आहे.

एकानं लिहिलं की, 'कदाचित गायीला ईर्ष्या झाली असेल...त्यामुळे मॅडमला आधी जाऊ द्या, त्यानंतर गजरा माळण्याचं काम पूर्ण करा'. दुसऱ्या लिहिलं की, 'मॅडमचा बॉडीगार्ड'. तिसऱ्यानं लिहिलं की, 'लेडीज फर्स्ट'. अशा अनेक मजेदार कमेंट्स लोक करत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाइक्सही मिळाले आहेत.

Web Title: Viral Video : Cow comes in middle of man putting gajra on wife hairs watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.