Video: धावत्या स्कूटीवर कपलची दारू पार्टी; तेवढ्यात झाला अपघात, पाहा व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 20:57 IST2023-04-11T20:55:43+5:302023-04-11T20:57:00+5:30
Viral Video: हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Video: धावत्या स्कूटीवर कपलची दारू पार्टी; तेवढ्यात झाला अपघात, पाहा व्हिडिओ...
Viral Video: दारू आरोग्यासाठी हानीकारक आहे, तरीदेखील अनेकांना दारुची सवय असते. काहीजण लपून-छपून दारू पितात, तर काहीजण खुल्लेआम पितात. दारुड्यांचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात धावत्या स्कूटीवर तरुण आणि तरुणी दारू पिताना दिसत आहेत.
व्हिडिओ पाहा-
— pessoas caindo ou quase (@uecaiu) April 8, 2023
एक तरुणी स्कूटी चालवत अशल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी एक तरुण तिच्या मागे बसला आहे. त्या तरुणाच्या हातात दारुचा ग्लास आहे. ते दोघे धावत्या स्कूटीवर दारू पित जाताना दिसत आहे. यावेळी ते स्वतःचा व्हिडिओ काढत असतात, तेवढ्यात तांचा अपघात होतो. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मागे बसलेला तरुण हातात मोबाईल घेऊन व्हिडिओ काढत असतो आणि तरुणी मागे पाहून पोज देते. तेवढ्यात त्यांची स्कूटी समोर असलेल्या कारव धडकते. ट्विटरवर @uecaiu नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 लाख लोकांनी पाहिला आहे, तर 24 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.