Video: जिराफला काहीतरी खायला देत होता मुलगा, मग झालं असं काही की आई-वडील गेले 'कोमात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 12:31 IST2022-03-08T12:30:08+5:302022-03-08T12:31:35+5:30

Viral Video : हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावरही शहारा येईल. एका प्राणी संग्रहालयात एक मुलगा जिराफला काहीतरी खायला देत होता. त्यावेळी जे झालं ते पाहून चक्रावून जाल.

Viral Video : Child was feeding the giraffe see what happened then | Video: जिराफला काहीतरी खायला देत होता मुलगा, मग झालं असं काही की आई-वडील गेले 'कोमात'

Video: जिराफला काहीतरी खायला देत होता मुलगा, मग झालं असं काही की आई-वडील गेले 'कोमात'

Viral Video : भूकेलेल्या लोकांना खाऊ घालणं पुंण्याचं काम समजलं जातं. पण हेच पुण्य करणं एका लहान मुलाला महागात पडलं. एका मुलासोबत असं काही झालं की, त्याच्या आई-वडिलाचा श्वास काही मिनिटांसाठी रोखला गेला होता. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावरही शहारा येईल. एका प्राणी संग्रहालयात एक मुलगा जिराफला काहीतरी खायला देत होता. त्यावेळी जे झालं ते पाहून चक्रावून जाल.

हा व्हिडीओ अशा लोकांसाठी एक चांगलं उदाहरण आहे जे प्राणी संग्रहालयात प्राण्यांच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. मजा म्हणून काही लोक प्राण्यांना काहीतरी खायला देतात. पण ते हे विसरतात की प्राण्यांच्या इतक्या जवळ जाणं खतरनाक ठरू शकतं. या व्हिडीओत तेच आहे. ज्यात एक मुलगा जिराफला काहीतरी खाऊ घालण्याचा विचार करत होता. यावेळी त्याचे आई-वडिलही त्याच्याजवळ उभे होते.

व्हिडीओ बघू शकता की, मुलगा आई-वडिलांसोबत उभा आहे. समोर जिराफ दिसत आहे. यावेळी मुलगा जिराफला काहीतरी खायला देतो. व्हिडीओत बघू शकता की, जिराफ ती वस्तू आपल्या तोंडात पकडतो, त्यासोबत मुलालाही वर उचलतो. हा धक्कादायक नजारा पाहून मुलाच्या आई-वडिलांना काही सुचत नाही. त्यांनी लगेच मुलाला खाली खेचलं.

आई-वडील कसे तरी मुलाला वाचवतात. तेव्हा त्यांच्या जीवात जीव येतो. वेळीच त्यांनी मुलाला पकडलं नसतं तर मुलासोबत काहीही वाईट घडलं असतं. हा व्हिडीओ @Laughs_4_All नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअऱ करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळत आहेत.
 

Web Title: Viral Video : Child was feeding the giraffe see what happened then