Video: खेळताना चिमुकला अचानक नाल्यात पडला; 60 वर्षीय वृद्धाने वाचवला जीव, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 14:27 IST2026-04-09T14:25:33+5:302026-04-09T14:27:03+5:30

Viral Video: घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video: child falls into drain; 60-year-old man saves his life, watch video | Video: खेळताना चिमुकला अचानक नाल्यात पडला; 60 वर्षीय वृद्धाने वाचवला जीव, पाहा व्हिडिओ

Video: खेळताना चिमुकला अचानक नाल्यात पडला; 60 वर्षीय वृद्धाने वाचवला जीव, पाहा व्हिडिओ

Viral Video:सोशल मीडियावर सध्या एका काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वृद्धाने दाखवलेल्या धाडसामुळे चिमुकल्याचा जीव वाचल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या घटनेत एका लहान मुलाचा जीव धोक्यात आला असताना वृद्धाने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे. हा व्हिडिओ एकीकडे धोक्याची जाणीव करून देतो, तर दुसरीकडे मानवता आणि धैर्याचे उत्तम उदाहरणही सादर करतो.

व्हिडिओत नेमकं काय? 

व्हिडिओत एक लहान मुलगी आणि मुलगा नाल्याच्या कडेला खेळताना दिसतात. यावेळी अचानक त्या मुलाचा तोल जाऊन थेट नाल्यात पडतो. मुलगा पाण्यात पडताच घाबरलेली मुलगी मदतीसाठी आरडाओरड करत इकडे-तिकडे धावू लागते.

दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच जवळच असलेल्या सुमारे 60 वर्षीय वृद्धाने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतो आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून थेट नाल्यात उडी मारतो. वृद्धाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि धाडसी कृतीमुळे मोठा अनर्थ टळला.

सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर झाल्यानंतर तो झपाट्याने व्हायरल झाला. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देत वृद्धाच्या धाडसाचे कौतुक केले असून खरे हिरो असेच असतात, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, ही घटना लहान मुलांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित करते. 

Web Title : बुजुर्ग व्यक्ति ने बच्चे को नाले से बचाया; वीडियो में कैद वीरतापूर्ण कार्य

Web Summary : 60 वर्षीय व्यक्ति ने बहादुरी से एक बच्चे को बचाया जो खेलते समय नाले में गिर गया था। वायरल वीडियो में आदमी बिना किसी हिचकिचाहट के नाले में कूदता हुआ दिखाई दे रहा है, जिससे संभावित त्रासदी टल गई। उनकी बहादुरी की व्यापक रूप से सराहना की जा रही है, जो बाल सुरक्षा के महत्व पर प्रकाश डालती है।

Web Title : Elderly Man Saves Child From Drain; Heroic Act Caught on Video

Web Summary : A 60-year-old man heroically saved a child who fell into a drain while playing. The viral video shows the man jumping into the drain without hesitation, averting a potential tragedy. His bravery is being widely praised, highlighting the importance of child safety.