Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 19:29 IST2025-12-31T19:29:06+5:302025-12-31T19:29:48+5:30
Anatoly weight lifiting prank video viral: 'अनाटोली'चा प्रँक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
Anatoly weight lifiting prank video viral: सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात, जे आपल्याला काहीतरी शिकवण देतात. कोणत्याही व्यक्तीच्या कपड्यांवरून किंवा कामावरून त्याच्या क्षमतेचा अंदाज लावू नये, असे अनेकदा बोलले जाते. सध्या असाच एक 'जिम प्रँक' व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये एका साध्या सफाई कामगाराच्या वेशातील व्यक्ती तगड्या बॉडीबिल्डर्सची बोलती बंद करताना दिसतो.
काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?
हा व्हिडिओ प्रसिद्ध युक्रेनियन पावरलिफ्टर 'वलोडिमिर श्मोन्डेंको' (Volodymyr Shmondenko) याचा आहे. त्याला जगभरात 'अनाटोली' (Anatoly) या नावाने ओळखले जाते. अनाटोली जिममध्ये सफाई कामगाराचे कपडे घालून जातो. ताज्या व्हिडिओमध्ये, काही बॉडीबिल्डर्स जिममध्ये जड वजन (Weights) उचलण्याचा सराव करत असतात. अनाटोली तिथे लादी पुसण्याचे काम करत असतो. त्याला पाहून बॉडीबिल्डर्स त्याची चेष्टा करू लागतात. अनाटोली मुद्दाम आधी फार अनुभवी नसल्यासारखे वागतो आणि जड वजन उचलण्याचा प्रयत्न करताना खाली पडण्याचे नाटक करतो. हे पाहून बॉडीबिल्डर्स हसतात आणि म्हणतात की, हे तुला जमणार नाही, तू फक्त सफाईकाम कर.
इथे फिरला 'गेम'
थोड्या वेळानंतर गोष्टी बदलतात. जे वजन उचलण्यासाठी तगड्या बॉडीबिल्डर्सना घाम फुटत होता, तेच वजन अनाटोली सहज उचलतो. एकदा नव्हे तर दोन ते तीन वेळा तो वजन उचलून खाली ठेवतो. हे पाहून तिथल्या बॉडीबिल्डर्सच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. आपण ज्या व्यक्तीची काही वेळापूर्वी चेष्टा करत होतो, तो लय भारी असल्याचे कळताच ते अवाक् होतात.
दरम्यान, हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @vladimirshmondenko या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला ३ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनाटोलीच्या या व्हिडीओवर लोकांना कमेंट करत म्हटले आहे की, हा खरा 'इगो डिस्ट्रॉयर' आहे. सारेच लोक यात अनाटोलीचे कौतुक करत आहेत.