Viral Video: लग्नात नवरा इतका बेभान झाला की नाचत नाचतच वधुवर उधळले पैसे, नवरी झाली शरमेने लाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 17:08 IST2022-06-07T16:49:45+5:302022-06-07T17:08:31+5:30
एक नवरा लग्न झाल्याच्या आनंदात इतका बेभान झाला की त्याने चक्क नवरीवरच नाचत नाचत पैसे उधळले. आजुबाजूचे वऱ्हाडी आ वासून त्याच्याकडे पाहतच राहिले.

Viral Video: लग्नात नवरा इतका बेभान झाला की नाचत नाचतच वधुवर उधळले पैसे, नवरी झाली शरमेने लाल
तुम्ही लग्नात वरातीतील लोकांना पैसे उडवताना पाहिलं असेल. वऱ्हाडी नवरा नवरीची नजर काढुन पैसे उडवतात पण नवरा चक्क नवरीवर पैसे उडवतानाचं दृष्य अतिशय दुर्लभ आहे. पण हे घडलं आहे. एक नवरा लग्न झाल्याच्या आनंदात इतका बेभान झाला की त्याने चक्क नवरीवरच नाचत नाचत पैसे उधळले. आजुबाजूचे वऱ्हाडी आ वासून त्याच्याकडे पाहतच राहिले.
तुम्ही व्हिडिओमध्ये पाहु शकता की कसा नवरा गिरक्या घेत घेत नवरीसमोर नाचतो आहे. तो इतका बेभान झालाय की त्याला आपलच लग्न आहे अन् आपल्या आजूबाजूला माणसं आहेत याचंही भान राहिलेलं नाही. त्याचा आनंद गगनात मावेनासा झालाय. तो नाचता नाचता खिशातील नोटा काढतो आणि नवरीवर उधळतो. लगेचच वऱ्हाड्यांमधील लहान मुलं पैसे गोळा करायला पुढे धावतात.
तो नाचत असताना अनेकजण त्याचे व्हिडिओही काढत आहेत. पण नेटकरी मात्र हा व्हिडिओ पाहुन अवाक् झाले आहेत. ते त्यावर हसतही आहेत. विविध कमेंट्स करत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ बघुन काय वाटले हे तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करुन आम्हाला सांगा.