Viral : ‘रिअल लाईफ GTA’चा थरार; रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी थेट हायवेवर उतरवले विमान...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 17:25 IST2025-12-28T17:24:23+5:302025-12-28T17:25:15+5:30
Viral Video: हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

Viral : ‘रिअल लाईफ GTA’चा थरार; रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी थेट हायवेवर उतरवले विमान...
Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक थरारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओत एका व्यक्तीने रस्त्यालगतच्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी चक्क विमान सामान्य रस्त्यावर लँड केल्याचे समोर आले आहे. जेवण झाल्यानंतर तो आरामात आपल्या खासगी विमानात बसून याच हायवेवरुनच टेकऑफही करतो.
व्हिडिओत नेमकं काय?
व्हिडिओत दिसते की, संबंधित व्यक्ती रेस्टॉरंटमधून बाहेर पडतो आणि रस्त्याच्या कडेला उभे असलेले काळ्या रंगाचे खासगी विमान तो चालवू लागतो. काही क्षणांतच हे विमान हायवेवरील धावत्या वाहनांच्या मधून पुढे सरकते आणि वेग घेत थेट हवेत झेपावते.
या संपूर्ण घटनेदरम्यान हायवेवरील वाहनचालक अक्षरशः स्तब्ध झालेले दिसतात. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण कैद केला. काही सेकंदांत विमानाने वेग घेत आकाशात झेप घेतली, मात्र या संपूर्ण प्रकारात कोणतीही दुर्घटना घडली नाही आणि कुणालाही इजा झाली नाही.
सोशल मीडियावर तुफान प्रतिक्रिया
हा व्हिडिओ newsbuzzhotline नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. हजारो लाईक्स आणि कमेंट्सही आले आहेत. एका युजरने लिहिले, “भाऊ तर रिअल लाईफ GTA खेळतोय.” दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली, “हे किती धोकादायक आहेत!” तर आणखी एका युजरने म्हटले, “म्हणूनच अमेरिकेला सुपरपॉवर म्हणतात, इथे काहीही शक्य आहे.”