VIRAL : एका आठवड्यात पैसे परत करेन म्हणणारी 'ऑनलाइन' मैत्रीण पालटली! १५ हजारांची मदत करणार्यालाच सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 13:01 IST2025-10-25T13:01:15+5:302025-10-25T13:01:43+5:30
नातं कोणतंही असो, त्यात विश्वास हा अतिशय महत्त्वाचा असतो. विश्वास असेल तर ते नातं घट्ट टिकून राहतं. मात्र, जर या विश्वासालाच कुणी सुरुंग लावला तर...

VIRAL : एका आठवड्यात पैसे परत करेन म्हणणारी 'ऑनलाइन' मैत्रीण पालटली! १५ हजारांची मदत करणार्यालाच सुनावलं
नातं कोणतंही असो, त्यात विश्वास हा अतिशय महत्त्वाचा असतो. विश्वास असेल तर ते नातं घट्ट टिकून राहतं. मात्र, जर या विश्वासालाच कुणी सुरुंग लावला तर... अशीच काहीशी घटना एका तरूणासोबत घडली आहे. या तरुणाने त्याच्या ऑनलाइन मैत्रिणीला वेळेप्रसंगी पैशांची मदत केली. पण, नंतर मात्र त्याच्यासोबत जे घडलं त्याने सगळ्यांचेच डोळे उघडतील. अनेकदा आपणही मित्र-मैत्रिणींना पैसे देतो. मात्र, तेच पैसे परत मिळायच्या वेळी डोकेफोडी करावी लागते. कधी कधी या पैशांमुळेच मैत्रीच्या नात्यात वितुष्ट येतात. आता या तरुणाने त्याच्यासोबत घडलेला किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
या तरुणाने रेडिटवर मैत्रिणीसोबत झालेल्या सांभाषणाचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. यूजरने लिहिले की, जेव्हा त्याची मैत्रीण आर्थिक अडचणीत होती, तेव्हा त्याने तिला मदत म्हणून १५ हजार रुपये पाठवले. पैसे मिळाल्यावर लगेच तिने 'थँक यू सो मच' म्हणत, 'पुढच्या आठवड्यात पैसे परत करेन' असे आश्वासन दिले होते. मित्राने तिच्यावर विश्वास ठेवला आणि 'ठीक आहे' म्हणून प्रतिसाद दिला.
९ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर उद्धट उत्तर
मैत्रिणीच्या शब्दांवर विश्वास ठेवून या तरुणाने नऊ महिने वाट पाहिली. त्याने एकदाही तिला पैशांसाठी दबाव आणला नाही. मात्र, इतका काळ उलटूनही पैसे परत न आल्याने त्याने हळूच पैशांबद्दल विचारणा केली. त्यावर मैत्रिणीने दिलेले उत्तर ऐकून तो स्तब्ध झाला. मैत्रिणीने चॅटमध्ये लिहिले की, "जर तुला वाटत असेल की मला तुझे पैसे परत करायचे नाहीत? तर तसे नाहीये. वारंवार मेसेज केल्याने काहीही बदलणार नाही. मी तुला पुन्हा मेसेज करण्याचा चान्स देणार नाही."
दबाव कशाचा?
मैत्रिणीच्या या उद्धटपणावर तरुणाने शांतपणे उत्तर दिले की, "खरं सांगायचं तर, मला तुमच्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती, पण मला खरे रूप दाखवल्याबद्दल धन्यवाद." यावर मैत्रिणीने लगेच पलटवार करत लिहिले, "आणि मलाही तुमच्याकडून अशा 'दबावा'ची अपेक्षा नव्हती. मी काही चोर नाहीये, मी तुमचे पैसे चोरत नाहीये." त्यावर तरुणाने विचारले, "दबाव? तूच म्हणाली होतीस की एका आठवड्यात पैसे परत करशील."
I helped a online friend when she needed it, and now she’s acting like I’m the problem
byu/fatguy514 inTeenIndia
दु:ख पैशांचे नाही, तर नात्याचे!
युजरने रेडिट पोस्टमध्ये स्पष्ट केले की, त्याने कधीही राग व्यक्त केला नाही किंवा चुकीचे शब्द वापरले नाहीत, केवळ नम्रतेने आपले पैसे परत मागितले होते. त्याने पुढे लिहिले की, त्याला पैसे उशिरा मिळत असल्याचं दु:ख नाहीये, तर एका चांगल्या मैत्रिणीने इतक्या लवकर रंग बदलल्याचे वाईट वाटले. "वेदना पैशांची नाही, तर या जाणिवेची आहे की, जेव्हा लोकांना तुमची गरज नसते, तेव्हा ते किती सहजपणे बदलतात," असे त्याने म्हटले.
या पोस्टवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पैसे आणि मैत्री एकत्र कधीच टिकत नाही, असा अनुभव अनेकांनी शेअर केला आहे.