Viral Stunt Video: स्वतःला पेटवून घेत इमारतीवरुन मारली उडी; पाहा थरकाप उडवणारा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 16:48 IST2022-03-31T16:26:12+5:302022-03-31T16:48:33+5:30
Viral Stunt Video:सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस स्वतःच्या शरीराला आग लावून उंच उमारतीवरुन उडी मारताना दिसत आहे.

Viral Stunt Video: स्वतःला पेटवून घेत इमारतीवरुन मारली उडी; पाहा थरकाप उडवणारा VIDEO
सोशल मीडियावर अनेकदा स्टंटचे अप्रतिम आणि तितकेच थरारक व्हिडिओ व्हायरल होत असतात. याशिवाय लोकप्रिय होण्यासाठीही काही लोक धोकादायक स्टंट करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओत एक व्यक्ती थरारक स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्वतःच्या अंगाला आग लावून इमारतीवरुन उडी मारताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हा माणूस दोन स्टंट करताना दिसत आहे. स्टंटच्या पहिल्या भागात तो इमारतीवर उभा असल्याचे दाखवण्यात आले आहे. जिथे त्याचा साथीदार त्याच्या अंगाला आग लावतो. काही वेळानंतर तो व्यक्ती इमारतीच्या छतावरुन उडी मारतो.
व्हिडिओ पहा:
व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पुढे दाखवण्यात आले आहे की, तो इमारतीवरुन उडी मारताच फोमच्या गादीवर पडतो. तिथे त्याच्या टीमचे सदस्य तात्काळ त्याच्या अंगाला लागलेली आग विझवितात. हा अतिशय धोकादायक स्टंट असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे.