Chandrika Dixit : "माझ्याकडेही पुरावे"; वडापाव गर्लच्या नवऱ्याचं 'एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर', ढसाढसा रडत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:45 IST2026-02-03T12:44:24+5:302026-02-03T12:45:01+5:30

Vada Pav Girl Chandrika Dixit : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये चंद्रिकाने तिचा पती युगम गेरा याच्यावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.

viral social Chandrika Dixit delhis viral Vada Pav Girl calls out husband for cheating | Chandrika Dixit : "माझ्याकडेही पुरावे"; वडापाव गर्लच्या नवऱ्याचं 'एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर', ढसाढसा रडत म्हणाली...

Chandrika Dixit : "माझ्याकडेही पुरावे"; वडापाव गर्लच्या नवऱ्याचं 'एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर', ढसाढसा रडत म्हणाली...

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि 'बिग बॉस ओटीटी'ची माजी स्पर्धक चंद्रिका दीक्षित म्हणजेच 'वडापाव गर्ल' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ती तिच्या वडापावमुळे नाही तर खासगी आयुष्यातील वादळामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये चंद्रिकाने तिचा पती युगम गेरा याच्यावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.

चंद्रिका दीक्षितने इन्स्टाग्रामवर एक भावूक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ढसाढसा रडताना दिसत असून तिने पतीच्या फसवणुकीबद्दल सांगितलं आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे की, "माझ्याकडेही पुरावे आहेत." तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. 

"२ महिन्यांपासून काय काय सहन करतेय..." 

"तुला नक्की काय हवंय? आता जगाला काय दाखवायचं आहे? आपली भांडणं? गेल्या २ महिन्यांपासून मी काय काय सहन करतेय हे कोणालाच माहीत नाही. २ महिन्यांहून अधिक काळ झाला मी गप्प आहे. मी काम करतेय, मूल सांभाळतेय, दुकान आणि व्यवसायाची सर्व जबाबदारी पेलतेय आणि तू हे सगळं करत आहेस? जी मुलगी दिवसभर 'पती-पती' म्हणत तुझ्या मागे-पुढे फिरते, तिच्यासोबत हे? अशा अनेक गोष्टी आहेत ज्याने माझ्या डोक्याच्या नसा फाटून जाताहेत. मी काम करू शकत नाही, मी काय करू?" असं चंद्रिका म्हणते. 

चंद्रिकाने पुढे रडत रडत सांगितलं की, तिने खूप काळ सहन केलं पण आता ती गप्प बसू शकत नाही. तिने पतीच्या अफेअरचे स्क्रीनशॉट्स आणि दुसऱ्या महिलेसोबतचे पतीचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून तो सध्या ट्रेंडिंग टॉपिक बनला आहे.


संघर्षातून मिळाली प्रसिद्धी

दिल्लीत रस्त्यावर वडापावची गाडी लावून चंद्रिका दीक्षित प्रसिद्ध झाली होती. तिच्या मेहनतीची आणि संघर्षाची कहाणी ऐकून लोकांनी तिला खूप प्रेम दिलं. त्यानंतर ती 'बिग बॉस ओटीटी'मध्ये दिसली, जिथे तिची लोकप्रियता आणखी वाढली. लग्नानंतरही ती एक सक्रिय इन्फ्लुएंसर म्हणून काम करत राहिली, पण आता तिच्या आयुष्यातील हा वैयक्तिक वाद एक मोठं वळण ठरत आहे. सोशल मीडियावर सध्या #ChandrikaDixit आणि #VadaPavGirl हे ट्रेंड होत आहेत.

Web Title : "मेरे पास भी सबूत हैं": वड़ा पाव गर्ल ने लगाया पति पर अफेयर का आरोप

Web Summary : 'वड़ा पाव गर्ल' चंद्रिका दीक्षित ने एक भावुक वीडियो में अपने पति पर बेवफाई का आरोप लगाया। उन्होंने सबूत के तौर पर स्क्रीनशॉट और तस्वीरें साझा कीं, और कहा कि काम और परिवार का प्रबंधन करते हुए उन्होंने चुपचाप बहुत कुछ सहा है। वीडियो वायरल हो गया है, जिससे सोशल मीडिया पर चर्चा छिड़ गई है।

Web Title : "I Have Proof Too": Vada Pav Girl Alleges Husband's Affair

Web Summary : Chandrika Dixit, the 'Vada Pav Girl,' accuses her husband of infidelity in a tearful video. She shared screenshots and photos as evidence, claiming she has endured much silently while managing work and family. The video has gone viral, sparking social media discussions.