कडक सॅल्यूट! या फोटोने सोशल मीडियावरील लोकांच्या मनात केलं घर, पोलिसवाल्याचं भरभरून कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 11:59 AM2021-05-08T11:59:03+5:302021-05-08T12:02:15+5:30

Social Viral " हा फोटो आयपीएस अधिकारी @SukirtiMadhav यांनी ट्विटवर शेअर  केलाय. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जर एक व्यक्ती कुत्र्यावर प्रेम करत असेल तर ती एक चांगली व्यक्ती आहे.

Viral pic Banaras policeman helps street dog drink water from Handpump | कडक सॅल्यूट! या फोटोने सोशल मीडियावरील लोकांच्या मनात केलं घर, पोलिसवाल्याचं भरभरून कौतुक!

कडक सॅल्यूट! या फोटोने सोशल मीडियावरील लोकांच्या मनात केलं घर, पोलिसवाल्याचं भरभरून कौतुक!

Next

देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक हैराण झाले आहेत. संक्रमण रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये नाइट कर्फ्यू आणि लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अशात सोशल मीडियावर व्हायरल हा फोटो लोकांचं मन जिंकत आहे. या फोटो एक पोलीस हॅंडपंपने एका मोकाट कुत्र्याला पाणी पाजताना दिसत आहे. हेच कारण आहे की, इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या पोलिसाचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. 

हा फोटो आयपीएस अधिकारी @SukirtiMadhav यांनी ट्विटवर शेअर  केलाय. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जर एक व्यक्ती कुत्र्यावर प्रेम करत असेल तर ती एक चांगली व्यक्ती आहे. सोबतच जर कुत्रा माणसावर प्रेम करत असेल तरीही तो चांगला आहे. अतुल्य बनारस!'. त्यांचं हे ट्विट व्हायरल झालं आहे. हे आर्टिकल लिहून होईपर्यंत याला ७ हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि सहाशेपेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. सोबतच अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.

हा फोटो ७ मे रोजी ट्विटर हॅंडल @policemedianews वरून शेअर करण्यात आला आणि कॅप्शन लिहिले होते की, 'हा फोटो बाबांची नगरी काशी विश्वनाथवाल्या वाराणसी पोलीस कमिश्नरेटचा आहे. पोलीस नेहमीच सेवा आणि सुरक्षेच्या भावनेने कार्य करतात. पोलीस कमिश्नरेटचा आहे. पोलीस नेहमीच सेवा आणि सुरक्षेच्या भावनेने कार्य करतात'. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Viral pic Banaras policeman helps street dog drink water from Handpump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app