Viral Photo : डोळे बारीक करून बघा हा फोटो, जे दिसेल त्यावर बसणार नाही विश्वास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 16:46 IST2022-04-13T16:46:25+5:302022-04-13T16:46:36+5:30
Jarahatke : असाच एक भ्रम निर्माण करणारा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. हा फोटो जर तुम्ही डोळे अर्धे बंद करून बघितला तर फोटो बदलतो.

Viral Photo : डोळे बारीक करून बघा हा फोटो, जे दिसेल त्यावर बसणार नाही विश्वास!
Jarahatke : सोशल मीडियामुळे लोकांच्या लाइफस्टाईलमध्ये मोठा बदल झाला आहे. सुरूवातीला सोशल मीडियाचा वापर लोक दूर असलेल्या मित्रांना संपर्क करण्यासाठी आणि आपल्या लाइफबाबत गोष्टी शेअर करण्यासाठी करत होते. पण आता चित्र बदललं आहे. सोशल मीडिया आता मनोरंजनाचंही माध्यम बनलं आहे. लोक यावर वेगवेगळ्या गोष्टी शेअर करतात. अलिकडे सोशल मीडियावर लोक ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो शेअर करत आहेत.
असाच एक भ्रम निर्माण करणारा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. हा फोटो जर तुम्ही डोळे अर्धे बंद करून बघितला तर फोटो बदलतो. या फोटोत आधी एका व्यक्तीचा चेहरा दिसतो. ज्यात ही व्यक्ती आपल्या मोठ्या डोळ्यांनी तुमच्याकडे रागाने बघताना दिसते. पण जसे तुम्ही डोळे अर्धे बंद करून बघाल तर तुम्हाला एक सुंदर हसतमुख तरूणी दिसेल.
असं सांगितलं जात आहे की, हा फोटो एका रशियन आर्टिस्टने बनवला आहे. या फोटोत एका तरूणीचा हसतानाचा चेहरा लपला आहे. पण हा फोटो पहिल्यांदा बघाल तर वाटतं की, एक तरूण तुमच्याकडे मोठे डोळे करून बघत आहे. जसे तुम्ही बारीक डोळे करून फोटो बघाल समोरचं चित्र पूर्णपणे बदलतं.
हा अनोखा फोटो लोकांना खूप आवडला आहे. फेसबुकसोबतच हा फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरही शेअर केला जात आहे. लोक स्वत:ही हा फोटो डोळे बारीक करून बघत आहेत आणि इतरांनाही बघायला सांगत आहेत. तुम्हीही बघा आणि सांगा तुम्हाला काय दिसतंय?