दिमाग खराब! याला सापडत नाहीये त्याची चप्पल अन् लोकांचं काहीतरी भलतंच सुरूये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 11:53 IST2019-10-30T11:49:40+5:302019-10-30T11:53:44+5:30

सोशल मीडिया हा किती मजेदार प्लॅटफॉर्म आहे हे काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मीम्स, फोटो आणि व्हिडीओज सतत यावर व्हायरल होत असतात.

Viral photo of a guy trying to find his slippers is all about meme now | दिमाग खराब! याला सापडत नाहीये त्याची चप्पल अन् लोकांचं काहीतरी भलतंच सुरूये!

दिमाग खराब! याला सापडत नाहीये त्याची चप्पल अन् लोकांचं काहीतरी भलतंच सुरूये!

सोशल मीडिया हा किती मजेदार प्लॅटफॉर्म आहे हे काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मीम्स, फोटो आणि व्हिडीओज सतत यावर व्हायरल होत असतात. या धकाधकीच्या जीवनात हसायला विसरलेल्या लोकांना या व्हायरल गोष्टींमुळे हसायची संधी मिळते. असाच एक भन्नाट फोटो व्हायरल झाला असून हा फोटो पाहून तुम्हालाही हसू फुटेल. या फोटोत एक व्यक्ती त्याची चप्पल शोधत आहे. त्याच्या समोर चपलांचा ढिग पडला आहे. तो चप्पल हैराण झाली आहे आणि लोक त्याची गंमत करत आहेत.

हा फोटो पाहून अनेकांचं डोकं चालायला लागलं आणि अनेकांनी यावर मीम्स तयार केले. त्याच्यासमोर असलेल्या सर्व चप्पल एकसारख्या आहेत. अशात तो कसा चप्पल शोधणार यावर उत्तर देण्याऐवजी लोकांनी मजेदार गोष्टी शेअर केल्यात. हा फोटो कुठला आहे, कुणाचा आहे याची काही माहिती उपलब्ध झाली नाही. पण तुम्ही हसण्यासाठी स्वतंत्र आहात.


Web Title: Viral photo of a guy trying to find his slippers is all about meme now