'ही' महिला च्युइंगम चघळून महिन्याला कमावते 67 हजारांहून अधिक रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 21:42 IST2022-07-27T21:41:35+5:302022-07-27T21:42:09+5:30

एकाच वेळी 30 च्युइंगम्स चघळते आणि फुगे बनवतानाचा व्हिडिओ शूट करते.

viral news of woman earns 67 thousand rupees a month by chewing gum | 'ही' महिला च्युइंगम चघळून महिन्याला कमावते 67 हजारांहून अधिक रुपये!

'ही' महिला च्युइंगम चघळून महिन्याला कमावते 67 हजारांहून अधिक रुपये!

काही लोकांना विचित्र गोष्टी करायला आवडतात. कधीकधी अशा गोष्टी करणे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. असेच काहीसे एका महिलेसोबत घडले. ही महिला दर महिन्याला च्युइंगम चघळून 67 हजार रुपये कमवते. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल आणि विचारात पडला असाल की असे कसे होऊ शकते. 

दरम्यान, जर्मनीतील एक महिला असेच करून भरपूर पैसे कमवत आहे. ती च्युइंगम चघळत त्याचे मोठे बुडबुडे बनवते आणि त्याचा व्हिडिओ बनवते आणि त्याच्या क्लिप विकते, ज्यातून त्याला भरपूर पैसे मिळतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर्मनीमध्ये राहणाऱ्या ज्युलिया नावाच्या या महिलेला दर महिन्याला च्युइंगम चघळून 67 हजार रुपये मिळतात. ती एकाच वेळी 30 च्युइंगम्स चघळते आणि फुगे बनवतानाचा व्हिडिओ शूट करते. हे करण्यासाठी ती फक्त 480 रुपये खर्च करते आणि या पैशातून च्युइंगम विकत घेऊन हजारो रुपये कमवते.

ज्युलियाच्या म्हणण्यानुसार, तिच्या एका मित्राने एकदा विनोद केला की ती च्युइंगमची व्हिडिओ क्लिप विकू शकते. यानंतर ज्युलियाने हे काम विनोदाने सुरू केले. ज्युलियाचे म्हणणे आहे की, तिने सर्वप्रथम याचे फोटो शेअर करायला सुरुवात केली. लोकांना ते खूप आवडायला लागले. त्यानंतर तिचे हे शेअर करण्याचे काम सुरू झाले. 

याचबरोबर, ज्युलिया म्हणते की, आता माझे बरेच चाहते आहेत. जेव्हा ते तिची व्हिडिओ क्लिप पाहतात तेव्हा ते त्यांच्या सूचना देतात, त्यानुसार मी माझे काम आणखी चांगल्या प्रकारे करते. ही माझ्यासाठी पार्ट टाइम नोकरी नाही.

Web Title: viral news of woman earns 67 thousand rupees a month by chewing gum