बापरे! हुंड्यात मिळाले १५ लाख, लग्नाआधीच नवरा मुलगा झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 23:45 IST2023-11-23T23:44:06+5:302023-11-23T23:45:46+5:30

आग्र्यात एक मुलगा हुंडा घेऊन पसार झाल्याचे घटना समोर आली आहे.

viral news groom missing ran away after leaving the engagement ceremony 10 lakh rupees police agra uttar pradesh | बापरे! हुंड्यात मिळाले १५ लाख, लग्नाआधीच नवरा मुलगा झाला फरार

बापरे! हुंड्यात मिळाले १५ लाख, लग्नाआधीच नवरा मुलगा झाला फरार

आग्रा येथून एक वेगळीच घटना समोर आली आहे. आपल्याकडे आता लग्नासाठी हुंडा देणं ही पद्धत बंद झाल्याचे बोलले जाते, पण तसे अजुनही झालेले नाही. देशात काही ठिकाणी हुंडा आजही दिला आणि घेतला जातो. आता हुंड्याबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एक मुलगा चक्क १५ लाख रुपयांचा हुंडा घेऊन फरार झाल्याची घटना समोर आली आहे.

IND vs AUS : ३ चेंडूत ३ विकेट! पण रिंकू ठरला 'फिनिशर', सोनेरी क्षणाचे व्हा साक्षीदार, VIDEO

आता वधूच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे प्रकरण ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवरी रोडचे आहे. येथे राहणाऱ्या हर्षित यादव नावाच्या मुलाचे लग्न ठरले होते. लग्न मुलीच्या घरी घेण्याच ठरलं. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा लग्नाच्या घरी लग्नासाठी आला होता. पण तो लग्नाआधीच फरार झाला आहे. त्या मुलाचा सर्वत्र शोध घेतला मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. त्याने फोनही बंद केला. लग्नाच्या नावाखाली १५ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप वधूच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

मुलीच्या वडिलांनी सांगितले की, लग्न वर्षभरापूर्वीच ठरले होते. लग्न निश्चित झाल्यानंतर मुलाच्या हातात १० लाख रुपये रोख ठेवण्यात आले. लग्न समारंभासाठी आलेल्या वराने १० लाख रुपये घेऊन पळ काढला.त्याशिवाय त्याच्या बँक खात्यात ३ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले आणि बाईक घेण्यासाठी १ लाख ८५ हजार रुपयेही दिले.  लग्न समारंभाच्या आधी जेवण होते आणि त्यादरम्यान मुलगा तेथून गायब झाला. त्यानंतर या घटनेची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

याबाबत मुलाच्या कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. पोलिस ठाण्यात तक्रार केल्यावर मुलगा बोलण्यास तयार झाला आणि काही तासांतच दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला. या मुलाचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: viral news groom missing ran away after leaving the engagement ceremony 10 lakh rupees police agra uttar pradesh