Viral News: झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयने एका आठवड्यात कमावले 'इतके' पैसे; आकडा चकीत करणारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 21:28 IST2025-10-17T21:25:08+5:302025-10-17T21:28:47+5:30
Zepto: सोशल मीडियावर झेप्टोच्या एका डिलिव्हरी एजंटने आपल्या एका आठवड्याच्या कमाईचा आकडा शेअर केल्यानंतर अनेकजण शॉक झाले.

Viral News: झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयने एका आठवड्यात कमावले 'इतके' पैसे; आकडा चकीत करणारा!
सोशल मीडियावर एका डिलिव्हरी एजंटने आपल्या एका आठवड्याच्या कमाईचा आकडा शेअर केल्यानंतर नोकरी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. बेंगळुरू येथील या डिलिव्हरी एजंटच्या कमाईचा आकडा पाहून अनेकांनी ऑफिसमधील कामापेक्षा डिलिव्हरी करणे अधिक सोपे आणि फायद्याचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
झेप्टोच्या डिलिव्हरी एजंटने २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या आठवड्यातील काही दिवसांची कमाई देखील शेअर केली, जी थक्क करणारी आहे. त्याने रेडिटवर केलेल्या पोस्टमध्ये असे सांगितले की, त्याने एका आठवड्यात (२९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान) एकूण ₹२१ हजार कमावले. त्याने या काळात एकूण ३८७ ऑर्डर्स डिलिव्हर केल्या. या कमाईसाठी दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत म्हणजेच १२ तास काम केले.
एवढी मोठी कमाई कशी केली, यावर एजंटने स्वतःच स्पष्टीकरण दिले. पावसळ्यात डिलिव्हरी करणे अधिक फायद्याचे ठरते. कारण पावसाळ्यात ऑर्डर वितरित केल्यास जास्त पैसे आणि वाढीव पैसे मिळतात. त्याने २ ऑक्टोबरला ३ हजार ३७९ रुपये, ३ ऑक्टोबरला ३,३७९ आणि ५ ऑक्टोबरला ४,०२० रुपये कमावले. त्यानंतर त्याने दुसऱ्या आठवड्यात तीन दिवस काम केले आणि ६००-७०० पेट्रोल वापरून तब्बल ₹१२,००० कमावले. कारण त्या दिवसांपैकी दोन दिवस सायंकाळी ६ ते मध्यरात्रीपर्यंत सतत पाऊस पडत होता, असे सांगितले. डिलिव्हरी एजंटची कमाई ठिकाण आणि कामाच्या वेळेनुसार बदलते, असेही त्याने स्पष्ट केले.
डिलिव्हरी एजंटच्या या कमाईवर सोशल मीडियावर खूप प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही वापरकर्त्यांनी त्यांच्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले. तर, काही जणांनी 'कोणी इतके कसे कमावू शकते' असा प्रश्न विचारत शंका व्यक्त केली. एका वापरकर्त्याने म्हटले की, "चला झेप्टो एजंट बनूया." दुसऱ्या व्यक्तीने "झेप्टो आपल्या एजंटना किती पैसे देते? त्यांना किती तास काम करावे लागते?" असा प्रश्न विचारला.