कष्टाला पर्याय नाही! डोक्यावर अनेक किलोंचे सामान घेऊन तरुणाने चालवली सायकल, IPS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 17:33 IST2023-01-09T17:33:11+5:302023-01-09T17:33:35+5:30
कष्टाला पर्याय नाही असं बोलले जाते. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी अनेकजण कष्ट करतात. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कष्टाला पर्याय नाही! डोक्यावर अनेक किलोंचे सामान घेऊन तरुणाने चालवली सायकल, IPS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ
कष्टाला पर्याय नाही असं बोलले जाते. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी अनेकजण कष्ट करतात. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती सायकल चालवत असलेला दिसत आहे. सायकल तर सगळीच चालवतात, पण यात एक व्यक्ती कित्येक किलोंचे ओझे डोक्यावर घेऊन चालवत असलेला दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.
सायकल चालवणारा व्यक्ती दोन्ही हात सोडून डोक्यावर ठेवलेले साहित्य पकडलेला दिसत आहे, दोन्ही हात सोडूनही सायकल चालवत असलेला व्यक्ती दिसत आहे. या रस्त्यातून दोन्ही बाजूंनी गर्दी असल्याचे दिसत आहे. तरीही हा व्यक्ती व्यवस्थित आपली सायकल चालवत असल्याचे दिसत आहे.
अनेकांना शहरात येऊन कष्ट करुन आपले कुटुंब सांभाळावे लागते. अनेकजण यात साहित्य देण्याची कामे करतात, तर शहराच्या या टोकावरुन त्या टोकावर साहित्य द्यायला लागते, यात काहीजण सायकलचा वापर करतात तर काहीजण हातगाडीचा वापर करतात. सोशल मीडियावर असाच एका कष्ट करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
और कुछ मिले ना मिले...life में बस इतना confidence मिल जाए... pic.twitter.com/bI6HcnuB1z
— Arif Shaikh IPS (@arifhs1) January 7, 2023
या व्हिडिओला नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ कोलकाता येथील असल्याचा दावा काहींनी केला आहे.
Amazing 👌👌❤️❤️ https://t.co/v079PZcatg
— Nasim Akhtar (@MohammadnasimAk) January 8, 2023