Viral News: एका दमात प्यायला दारुची बॉटेल; शुल्लक पैज जिंकण्याच्या नादात गमवावा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 21:00 IST2022-07-18T21:00:20+5:302022-07-18T21:00:33+5:30
Trending News: अनेक वेळा लोक शुल्लक पैज जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात. पण, अशी पैज जीवघेणीही ठरू शकते.

Viral News: एका दमात प्यायला दारुची बॉटेल; शुल्लक पैज जिंकण्याच्या नादात गमवावा जीव
Man Died After Drinking Wine Bottle: अनेक वेळा लोक शुल्लक पैज जिंकण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात. साधी पैज जिंकण्यासाठी काहीजण कोणत्याही थराला जायला तयार असतात. अनेकवेळा अशी पैज जीवघेणी ठरू शकते. अशाच प्रकारची घटना दक्षिण आफ्रिकेत घडली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील घटना
हे संपूर्ण प्रकरण दक्षिण आफ्रिकेतील आहे. तिथे एक व्यक्ती एका दमात दारुची अख्खी बाटली प्यायला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 10 जुलै रोजी घडली. एका रेस्टॉरंटमध्ये काही लोकांनी पैज लावली होती की, जो दारुची बाटली संपवेल तो पैज जिंकेल आणि त्याला 1000 रुपये मिळतील.
A 23 years old man from Mashamba village in Venda collapsed and later died after consuming 1 bottle of jagermeister. pic.twitter.com/PFQwpLnhh9
— MokupiPogisho👁️ (@MokupiPogisho) July 11, 2022
पैज जिंकण्यासाठी एका व्यक्तीने अवघ्या 2 मिनिटांत दारुची बाटली संपवली. मात्र त्यानंतर लगेचच त्याची प्रकृती खालावली. लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.